राष्ट्रीय गणित दिन 2024 संकल्पना - प्रत्येकासाठी गणित National Mathematics Day 2024 Theme - Mathematics for ever one.
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त २० ते २२ डिसेंबर या कालावधीत "गणितोत्सवाचे" आयोजन करण्यात येणार आहे.
गणितोत्सव - 2024 ची प्रमुख संकल्पना - नवनिर्मिती आणि प्रगतीसाठी गणित: एक दुवा"
National Mathematics Day 2024 Theme -
Mathematics: The Bridge to Innovation and Progress
निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, 2024 या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या "गणितोत्सव 2024" ची प्रमुख संकल्पना (Theme) "नवनिर्मिती आणि प्रगतीसाठी गणित: एक दुवा" (Mathematics: The Bridge to Innovation and Progress) ही निश्चित करण्यात येत आहे.
पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता
पायाभूत संख्याज्ञान म्हणजे साध्या संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव समजून घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापर करणे. गणनपूर्व संकल्पना, संख्यांची संकल्पना तसेच तुलना करणे, क्रमवार लावणे, वर्गीकरण करणे, आकृतिबंध ओळखणे यांचे ज्ञान शाळापूर्व काळात होणे महत्वाचे आहे. पूर्व प्राथमिक वर्गात मूलभूत गणित शास्त्राचा पाया पक्का होण्यासाठी वरील बाबी महत्वाच्या आहेत.
गणितोत्सव 2024 - शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम
1) गणित परिपाठ (20 ते 22 डिसेंबर)- गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी/ कूटप्रश्न, गणित विषयक गाणी/ बडबड़ गीते, इत्यादी
2) 20 डिसेंबर -
राष्ट्रीय गणित दिन 2022 संकल्पना - पायाभूत संख्याज्ञान व गणितीय क्षमता National Mathematics Day 2022 Theme - Fundamental Numeracy
0 Comments