Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीनिवास रामानुजन निबंध | वक्तृत्व | माहिती नमूना 1

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी या महान गणितज्ञाचे आकस्मिक निधन झाले.

शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त २० ते २२ डिसेंबर या कालावधीत "गणितोत्सवाचे" आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन करण्याबाबतचे परिपत्रक व संपूर्ण नियोजन पहा. 

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार निबंध | वक्तृत्व | माहिती नमूना 1

महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू राज्यामधील तंजावर जिल्ह्यातील ऐरोड या गावी झाला. लहानपणापासूनच ते खूप हुशार होते. पण त्यांच्या घराची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. म्हणून पैसे मिळवण्यासाठी त्यांना स्वतःला कधी कोणाचा हिशेब लिहून दे. कधी कोणाची शिकवणी घे अशी कामे करावी लागत असे.

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. 


लहानपणापासून श्रीनिवास रामानुजन हे गणितात अतिशय हुशार होते. गणिताचा पेपर चुटकीसरशी सोडवत असत. प्रत्येक परीक्षेत गणितात त्यांनी पैकी च्या पैकी गुण मिळत असत. परंतु गणिताच्या वेडापाई त्यांचे इतर विषयांकडे दुर्लक्ष होत असत. एकदा तर इंग्रजीत चक्क नापास झाले होते एखादे गणित अनेक पद्धतीने कसे सोडवावे याची कला आणि ज्ञान त्यांना अवगत होते. दोन वर्षातच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या सातव्या वर्षीच ते हायस्कूल मध्ये दाखल झाले होते.

श्रीनिवास रामानुजन यांचं गणित एवढं निराळं होतं की, 'जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी' या जर्नलमध्ये त्यांनी जे शोधांनिबंध पाठवले ते या जर्नलमधील परीक्षक तपासू शकले नाही. यामुळे एका परीक्षकाने त्यांचे शोधनिबंध लंडनला तपासायला पाठवले. प्राध्यापक हारडी जे रामानुजन यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी रामानुजनाला केंब्रिज विद्यपीठाकडून शिष्यवृती मिळवून दिली आणि रामानुजन यांना केंब्रिज विद्यापीठात बोलावून घेतले. येथे रामानुजन यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला. आणि रामानुजन यांच्या संशोधांनाला वेग मिळाला. 

वाचा - गणितोत्सव - 2021 ची प्रमुख संकल्पना National Mathematics Day 2021 Theme 

केम्ब्रिज विद्यापीठात जगविख्यात प्राध्यापक जी. एच. हार्डी यांच्या संपर्कात आल्यानंतर रामानुजन यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी प्रा. शेषू अय्यर यांच्या माध्यमातून आपले सिद्धांत आणि सूत्रांची काही शोधपत्रे प्रा. जी. एच. हार्डींना पाठवली. त्याने प्रभावित होऊन हार्डी यांनी त्यांचे काही अनुत्तरित प्रश्न रामानुजन यांच्याकडे पाठवले. रामानुजन यांनी अत्यंत सहजरीत्या या प्रश्नांची उत्तरे दिली. हार्डींनी रामानुजन यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले. रामानुजन यांनी तेथे हार्डीसोबत अनेक शोध लावले.

फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते. तसेच ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते प्रथम भारतीय ठरले.

रामानुजन यांचा गणिते सोडवण्याचा वेग अविश्वासनिय होता. मिळेल त्या कागदावर ते गणित सोडवत असे. कधी कधी ते पाकीटांवर गणित सोडवत असे. गणित सोडवताना ते पहिली स्टेप, तिसरी स्टेप, आठवी स्टेप अशा वेगाने सोडवत. सारी कॅलक्युलेशन ते मनातच करत असत.

विलक्षण प्रतिभेच्या आधारे रामानुजन यांनी आपल्या अल्प जीवनात 3884 गणितातील प्रमेये आणि सिद्धांतांचा संग्रह केला. त्यांनी सहज ज्ञान व बीजगणितावरील अद्वितीय प्रभुत्वाच्या आधारे या क्षेत्रात मोठे योगदान दिले.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित करावयाचे संपूर्ण कार्यक्रम पहा. 

रामानुजन यांनी मॅथेमॅटिकल अॅनालिसिस, इन्फिनाइट सिरीज, नंबर थिअरी व कॉन्टिन्यूड फ्रेक्सन्समध्ये अतुलनीय योगदान दिले.

संयुक्त संख्यावर त्यांनी खूप काम केल होतं. यावर आधारित त्यांचा शोधांनिबंध ‘प्रोसीडीङ्ग्स ऑफ द लंडन मॅथमॅटिकल सोसायटी’ मध्ये प्रसिद्ध झाला होता. गणितावर खूप सारे संशोधन करून 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू झाला.

त्यांनी गणितीय विश्लेषण आणि संख्या पद्धतीच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी प्रतिभा व जिद्दीच्या जोरावर गणितीय सिद्धांताचा शोध लावत भारताची मान जगभरात उंचावली.

त्यांनी मॉक थीटा फंक्शनचा शोध लावला होता. याचा उपयोग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आरोग्य क्षेत्रात कॅन्सरवरील उपचारासाठी केला जातो.

Post a Comment

0 Comments

close