"निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त २० ते २२ डिसेंबर या कालावधीत "गणितोत्सवाचे" आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणित विषयाचे पूर्व प्राथमिक स्तरापासून कृती आधारित व आनंदायी पद्धतीने अध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनच खेळ आधारित अध्यापन शास्त्र, गणितीय खेळ, कोडी, परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, गणित विषयाची ध्येये ज्यामध्ये पायाभूत स्तरावर प्रारंभिक संख्याज्ञान संपादन ते परिसरातील अनुभवांशी गणिताची जोड, व्यवहारात सहजतेने वापर ते उच्च विचार प्रक्रियांचे विकसन गणितीय तर्क करणे, गणितीय मर्मदृष्टी (Mathematical Intuition) ते विचारांचे गणितीकरण यांचा समावेश आहे.
गणितोत्सव - 2024 ची प्रमुख संकल्पना Theme
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/L2IiEVDp0U2E3XlFJyL00A
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे" आयोजन दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर, 2024 या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या "गणितोत्सव 2024" ची प्रमुख संकल्पना (Theme) "नवनिर्मिती आणि प्रगतीसाठी गणित: एक दुवा" (Mathematics: The Bridge to Innovation and Progress) ही निश्चित करण्यात येत आहे.
वाचा - गणितोत्सव - 2024 ची प्रमुख संकल्पना - National Mathematics Day 2024 Theme
पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता
पायाभूत संख्याज्ञान म्हणजे साध्या संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव समजून घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापर करणे. गणनपूर्व संकल्पना, संख्यांची संकल्पना तसेच तुलना करणे, क्रमवार लावणे, वर्गीकरण करणे, आकृतिबंध ओळखणे यांचे ज्ञान शाळापूर्व काळात होणे महत्वाचे आहे. पूर्व प्राथमिक वर्गात मूलभूत गणित शास्त्राचा पाया पक्का होण्यासाठी वरील बाबी महत्वाच्या आहेत.
गणितोत्सव 2024 अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
सदर नियोजन करत असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा. दिवस निहाय खालीप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
अ) शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम
ब) पोस्टर निर्मिती उपक्रम
विद्यार्थ्यांना गणितीय संबोध तसेच गणिताची गोडी विकसित व्हावी याकरिता चालना देण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) संकल्पनेवर आधारित सर्जनशील व नाविन्यपूर्ण पोस्टर निर्मिती करणे अपेक्षित आहे. सदर पोस्टर मधून उत्कृष्ट पोस्टर/संकल्पना शाळेमध्ये छपाई समृद्ध वातावरण (Print Rich Environment) निर्मिती करण्याकरिता निवडले जाणार आहेत. याकरिता पोस्टर निर्मितीकर्त्यांची सहमती असणे आवश्यक आहे. निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट पोस्टर निर्मितीकर्त्यास राज्यस्तरावरून प्रमाणपत्र देण्यात येईल. राज्यातील शिक्षक, अधिकारी, गणित प्रेमी व शिक्षण तज्ञ यांनी पोस्टर निर्मिती उपक्रमांतर्गत सक्रीय सहभाग घ्यावा.
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाथा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर इंस्टाग्राम, फेसबुक, #Nationaleducationnpolicy२०२०, #Mathematicsday२०२४, #Ganitotsav२०२४, #Mathematicsforeveryone, #SCERTMAHARASHTRA या HASHTAG (#) चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी व प्रस्तुत कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज SCERT, MAHARASHTRA ला टॅग करावे.
" गणित्तोत्सव-2024" चे आयोजन उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हावे याकरिता आपले स्तरावरून प्रयत्न करावेत तसेच आपण व क्षेत्रीय अधिकारी यांनी भेट द्यावी.
0 Comments