Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "रामानुजन गणित उद्यान" ची प्रतिकृती. आदर्श शाळा लांजा नं.5 चा उपक्रम

आदर्श शाळा लांजा नं.5  मध्ये गणितोत्सव उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "रामानुजन गणित उद्यान" ची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी  20 ते 22 डिसेंबर दरम्यान गणितोत्सव उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. 

गणितोत्सव उपक्रमांतर्गत जि. प. शाळा लांजा नं. 5 मध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये दैनिक परिपाठात गणित तज्ञांच्या गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी, गणित विषयक गाणी घेण्यात आली. गणितीय रांगोळी काढण्यात आली. प्रश्नमंजुषा घेण्यात आली. 

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित करावयाचे संपूर्ण कार्यक्रम पहा. 

शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच मुलांमध्ये गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी शाळेत नियमित वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.

शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. क्रांती श्रीकांत बेर्डे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रामानुजन गणित उद्यान ची प्रतिकृती तयार करण्यात आली. या प्रतिकृतीमध्ये विविध गणितीय संकल्पना दाखविण्यात आल्या आहेत. बागेला  आकर्षक अशी कमान करण्यात आली आहे. या उद्यानाविषयी जाणून घेऊया. 

रामानुजन गणित उद्यान 


1) फुले व फुलपाखरे - 1 ते 100 संख्या फुले आणि फुलपाखरांच्या रुपात दाखविण्यात आल्या. यामधून मनोरंजक पद्धतीने संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, पाढे यांची ओळख करुन देता येईल. 

2) भौमितिक आकार - भौमितिक आकारापासून उद्यानामध्ये बसण्यासाठी आकर्षक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 

3) सी-सॉ - सी-सॉ द्वारे लहान - मोठेपणा, जड - हलके, यांसारख्या गणितीय तुलनांची माहिती करून देता येईल.

4) झोपाळा - यामधून पुढे-मागे, कोन, रेषा यांची ओळख करुन देता येईल.

5) संरक्षक भिंत - सॅनिटायझर बॉटल्सच्या टाकाऊ खोक्यांचा उपयोग बागेच्या संरक्षक भिंतीसाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने केला आहे. यावर महान गणिततज्ञ यांची सचित्र माहिती दर्शविण्यात आली आहे. 

6) कचराकुंडी - बागेतील कचराकुंडी चा उपयोग भागाकार व विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासण्यासाठी करता येईल. उदा- 2 ने विभाज्य संख्या मला द्या. 

7) बागेतील झाडे - बागेतील झाडावर संख्या प्रतिके अगदी फुलाप्रमाणे भासत आहेत. 

8) गणितीय सूचना फलक - बागेत ठिकठिकाणी लावलेले गणितीय सूचना फलक गणितीय संकल्पना दृढीकरण करण्यास मदत करत आहेत. 

9) गणिताची आगगाडी - गणिताची आगगाडी यामधून क्रमवार संख्या, चढता उतरता क्रम, या संकल्पना समजावून सांगता येतील. 

10) गणितीय चिन्हे - टाकाऊ वस्तूंपासून बनविलेली विविध गणितीय चिन्हे ठिकठिकाणी बागेची शोभा वाढवत आहेत. 

सदर रामानुजन गणित उद्यान ची प्रतिकृती उपक्रमशील शिक्षिका श्रीम. क्रांती श्रीकांत बेर्डे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली. या प्रतिकृतीतील सर्व सजावट, खेळणी सर्व विद्यार्थ्यांनी खूप आकर्षक पद्धतीने तयार केलेली आहेत. या उपक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांनी भेट देऊन कौतुक केले. 

गणितोत्सव 2021 अंतर्गत उपक्रम

1) गणित परिपाठ (20 ते 22 डिसेंबर)- गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी/ कूटप्रश्नगणित विषयक गाणी/ बडबड़ गीते, इत्यादी

2) 20 डिसेंबर - 





Post a Comment

0 Comments

close