Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणित जत्रा / गणित मेळावा / गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन - शाळा लांजा नं. 5

गणित जत्रा / गणित मेळावा / गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. 5 येथे भरविण्यात आले. 

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "रामानुजन गणित उद्यान" | लांजा नं. 5 शाळेचा उपक्रम | जाणून घेऊया या गणित गार्डन बाबत. - Click Here

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त जि. प. शाळा लांजा नं. 5 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 


यावर्षी मुलांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणितीय कृती, त्यांनी बनविलेले गणितीय शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनास सर्व विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी भेट दिली. या प्रदर्शनास जत्रेचे स्वरुप आले होते. 

सदर गणित जत्रा / गणित मेळावा यामध्ये विविध शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. 
गणित जत्रा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अनेक गणिती उपक्रम सादर केले. त्यातील काही उपक्रम

१- मसावि
दोन संख्या घेणे. तेवढ्याच कॅरम सोंगट्या घेऊन दोन्हींमध्ये जेवढ्या कमी सोंगट्या असतील तेवढ्या कमी कमी करत जाणे. समान सोंगट्या राहतील जेवढ्या असतील तेवढा मसावि. 

२- लसावि
१ ते १०० अंक चार्ट पाढ्यातील संख्यावर दोन वेगवेगळ्या रंगाच्या चिट्टया ठेऊन त्या चिट्टया ज्या ठिकाणी एकत्र येतील तो लसावि. 


३- पाढे चक्र
सुर्यफुलासारखे दिसणारे पाढेचक्र खूपच आकर्षक होते.

४- चलन वृक्ष
छोट्या रोपट्याच्या फांद्याला चलनी नोटा लावून आकर्षक असा चलनी वृक्ष दिमाखात उभा दिसतो.

५- सुत्रांचे झाड
चलनी वृक्षाप्रमाणेच सुत्राचे झाड सुद्धा सुंदर होते.


६- कोनाचे प्रकार
कोनाचे प्रकार शैक्षणिक मॉडेल व सादरीकरण करणारे विद्यार्थी खूपच बोलके..


७- रोमन अंक
रोमन अंक तक्ता रोमन अंकाविषयी गोडी लावत होता.

८- संख्या रेषा

९- गणिती कोडे


१०- कलात्मक भूमिती
गणित पेटीतील वेगवेगळे आकार घेवून त्यापासून कलात्मक रित्या साकारलेल्या आकृत्या मन वेधून घेत होत्या. आलेख, चढता उतरता क्रम, या संकल्पना मुलांनी सहज स्पष्ट करुन सांगितल्या.


११- मनातील संख्या ओळखणे
मनातील संख्या गणितीय पद्धतीने ओळखणारा हा उपक्रम खूपच आश्चर्यकारक होता.

12) गणितीय कोडे - 24 ठोकळे एका रेषेत 5 असे 6 रेषेमध्ये लावणे. 


13) जॉमेट्री ट्री - गणित विषयातील भूमितीय आकृत्यांची संकल्पना याद्वारे स्पष्ट करण्यात आली होती. 

14) गणिती कॅलेंडर - सन 2023 या वर्षाचे दिनांक महिण्यानिहाय गणित भाषेत लिहिलेले होते. यातून मुलांना भौमीतिक क्रिया, वर्ग, घन, घातांक, या संकल्पनांचे दृढीकरण करता आले. 

15) किती वाजले?
घड्याळातील अंक विशिष्ट गणितीय क्रिया करुन घड्याळात रचना केलेली होती. याद्वारे कालमापन, भौमितिक क्रिया, यांचे दृढीकरण झाले. 



असे अनेक विषय घेवून मुलांनी सादरीकरण केले. या उपक्रमामुळे मुलांना गणिता विषयी आवड निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.

1) गणित परिपाठ (20 ते 22 डिसेंबर)- गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी/ कूटप्रश्नगणित विषयक गाणी/ बडबड़ गीते, इत्यादी

2) 20 डिसेंबर - 





Post a Comment

0 Comments

close