Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली बघा, अहो शाळेत शिकवायला !




सावित्री निघाली बघा, अहो शाळेत शिकवायला!
लोक कर्मठ जमले हो तिला धोंडे मारायला !!

सावित्रीला त्यांनी बघा दिला जरी त्रास
तिळभर ना डगमगली ना सोडला तिने ध्यास
ध्यास स्त्री शिक्षणाचा या सावित्रीने घेतला !!१!!

स्त्री जातीच्या मुक्तीची पाहा घेऊनिया आस
माझी सावित्री निघाली तोडण्या बंधनाचे फास
ज्ञान देऊनी स्त्रियांना रस्ता मानाचा दावण्या !!२ !!



बालविवाह,सतीप्रथा,केशवपन , विधवामाता
या अन्यायकारक प्रथा त्यांना उखडून टाकण्या
पाहा ज्योतीसंग हिने खूप सोसल्या हो यातना!!३!! 

माझ्या सावित्रीची पाहा काही गोष्टच होती न्यारी
अर्धांगिनीही ज्योतीची पहा आद्य शिक्षिका ही झाली ही
त्या सवित्रिमातेला मुजरा माझा मानाचा करण्या
आता ही सावित्री अहो शाळेत शिकवण्या!!४!!

सौ.केतकी प्रविण चोपडे
जि. प.प्राथमिक शाळा लांजा नं. 5



Post a Comment

0 Comments

close