राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी २०२२ या दरम्यान 'जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' अभियान राबिवण्यात येणार आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये "जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
"जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" या अभियानांतर्गत शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांनी विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
धर्मनिरपेक्षतेची मूल्य रुजविणारी राजमाता जिजाऊ - Click Here
सावित्रीबाई फुले निबंध, भाषण, पहा. - Click Here
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली हो ...
भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशी दोन महत्त्वाची स्त्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत. जिजाऊंचे एकूणच व्यक्तिमत्त्व एक 'माता' म्हणून जितके प्रभावशाली होते तितकेच ते एक समर्थ, स्वावलंबी, स्वाभिमानी, आत्मविश्वासाने परिपूर्ण, अचूक राजकीय निर्णयक्षमता, सामाजिक भान, महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली अष्टपैलू 'स्त्री' म्हणून देखील प्रभावशाली होते. जिजाऊंच्या या समग्र गुणांचे अनुकरण जर आजच्या मुलींनी केले तर नक्कीच स्त्रीसबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल.
राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन - Click Here
भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन | बालिका दिन फलकलेखन | महिला शिक्षण दिन फलकलेखन
जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अगदी शालेय स्तरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे. हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा स्त्री सन्मान मार्ग आहे.
यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
"जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम
03 जानेवारी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन
03 जानेवारी - वेशभूषा - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले- Click Here
4 जानेवारी - आरोग्य तपासणी शिबीर - शालेय स्तरावर मुला-मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे.
4 जानेवारी -मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र - शाळेमध्ये आरोग्यसेविका, स्त्री-शिक्षिका, आशा वर्कर मार्फत किशोरवयीन मुलींसाठी उद्बोधनसत्र आयोजित करणे.
5 जानेवारी - निबंधलेखन स्पर्धा
6 जानेवारी - यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती - Click Here
7 जानेवारी - आनंदनगरी - Click Here
8 जानेवारी - चित्रकला
माझी उंची- माझी स्वप्ने - Click Here
8 जानेवारी - किल्ला शिल्प
प्रसिद्ध किल्ले / शिल्प यांच्या प्रतिकृती तयार करणे. - Click Here
10 जानेवारी - पोवाडागायन उपक्रम / समूहगायन उपक्रम
11 जानेवारी - व्याख्याने परिसंवाद आयोजन
१. महिला सक्षमीकरण: कायद्याची भूमिका - Click Here
२. महिला स्वसंरक्षण: सन्मानाचा मार्ग - Click Here
३. सायबर सुरक्षा आणि जागृती - Click Here
४. आनंदमयी आणि आरोग्यदायी शाळा
12 जानेवारी - वेशभूषा - राजमाता जिजाऊ - Click Here
12 जानेवारी - एकांकिका/ एकपात्री नाटिका
१. मी आजची सावित्री - Click Here
२. मला फुलू दया - Click here
३. मी जिजाऊ बोलते - Click Here 1, Click Here2
४. प्रत्येक कळीला हक्क आहे उमलण्याचा - Click Here
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम)
Facebook, Twitter, Instagram वर Video / photo कसे शेअर करावेत❓
Facebook-Go to Facebook - Click Here
Twitter-Go to Twitter - Click Here
Instagram- Go to Instagram - Click Here
Telegram-Go to Telegram - Click Here
#ballikadivas2022, #mahilashikshandin2022 #misavitri2022. #mijijau2022 या HASHTAG (# ) चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी.
सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
0 Comments