Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तयास मानव म्हणावे का? - सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकार हे काव्यसंग्रह लिहिले. याच काव्यसंग्रहातील एक गाजलेली कविता - तयास मानव म्हणावे का? 

सावित्रीबाई फुले यांची कविता - तयास मानव म्हणावे का? 

तयास मानव म्हणावे का?

ज्ञान नाही विद्या नाही 

ते घेणेची गोडी नाही

बुद्धी असुनि चालत नाही 

तयास मानव म्हणावे का? १


दे रे हरी पलंगी काही

पशूही ऐसे बोलत नाही

विचार ना आचार नाही त

यास मानव म्हणावे का?  २

http://bit.ly/read-more-poems

पोरे घरात कमी नाहीत

तयांच्या खाण्यासाठीही

ना करी तो उद्योग काही

तयास मानव म्हणावे का?  ३


जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here

सहानुभूती मिळत नाही

मदत न मिळे कोणाचीही 

पर्वा न करी कशाचीही 

तयास मानव म्हणावे का?  ४


दुसऱ्यास मदत नाही 

सेवा त्याग दया माया नाही 

जयापाशी सदगुण नाही 

तयास मानव म्हणावे का?   ५


ज्योतिष रमल सामुद्रीकही

स्वर्ग नरकाच्या कल्पनाही 

पशुत नाही त्या जो पाही 

तयास मानव म्हणावे का?  ६


बाईल काम करीत राही 

ऐतोबा हा खात राही 

पशू पक्षात ऐसे नाही 

तयास मानव म्हणावे का? ७


पशु-पक्षी माकड माणुसही

जन्ममृत्यु सर्वा नाही 

याचे ज्ञान जराही नाही 

तयास मानव म्हणावे का?  ८


सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली बघा, अहो शाळेत शिकवायला ... 


http://bit.ly/read-more-poems

Image download



Post a Comment

0 Comments

close