दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 संदर्भात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत शाळा व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here
दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2022 या ऑफलाईनच होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा तिथे केंद्र / उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल. १५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी एकापेक्षा अधिक माध्यमिक शाळा एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल, अशा प्रकरणी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था त्यांना परीक्षेपूर्वी माहित करून दयावी. कोणताही विद्यार्थी या कारणास्तव परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४/०३/२०२२ ते ३०/०३/२०२२ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दिनांक १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा 2022 चे सुधारित अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
0 Comments