राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णतः अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ( वेतन आयोग फरक, मेडिकल बील, प्रवास दर्शन बील, शाळा थकीत भाडे, अग्रीम रक्कम) ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
Income Tax Calculator
या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
राज्यातील खाजगी अंशतः व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत देयके, वैद्यकीय देयके, सातव्या वेतन आयोगामध्ये सुधारीत वेतन संरचना लागू केल्याने दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीमधील ५ समान हप्त्यात अदा करावयाची थकबाकी इत्यादी देयकांना शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने अशी सुविधा मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध करून देण्याच्या अटीस अधीन राहून दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या मंजूर देयकांना ऑफलाईन पध्दतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामध्ये खालील प्रकारच्या देयकांचा समावेश राहील
0 Comments