भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच, नवीन पिढीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा - Click Here
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधीत विषयावर परिसंवाद, त्यांच्या विचारधारांवर आधारित ग्रंथोत्सव, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here
इ. 1ली ते इ. 12वी गट निहाय कार्यक्रम पहा.
गट पहिला - इयत्ता १ली ते ५वी साठी कार्यक्रम
कार्यक्रमाचे नाव
१. वक्तृत्व स्पर्धा
२. एकपात्री अभिनय ( वेशभूषासह ) स्पर्धा
३. चित्रकला स्पर्धा
विषय
२. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग
Click Here
तपशील
वक्तृत्व आणि एकपात्री अभिनय (वेशभूषेसह) दिलेल्या तीनपैकी कोणत्याही विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
चित्रकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग या विषयावर A4 आकाराच्या कागदावर चित्र काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा - Click Here
गट दुसरा - इयत्ता 6वी ते 8वी साठी उपक्रम
कार्यक्रमाचे नाव
३. स्वरचित कविता
४. काव्यवाचन
५. पोस्टरनिर्मिती
६. रांगोळी स्पर्धा.
विषय
१. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग Click Here २. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - Click Here ३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे | विविधांगी पैलू Click Here
तपशील
निबंधलेखन दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर ३०० ते ५०० शब्दांपर्यंत A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.
वक्तृत्व दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करावा.
स्वरचित कवितालेखन आणि काव्यवाचन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित स्वरचित कविता A4 आकाराच्या कागदावर लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि काव्यवाचनासाठी काव्य म्हणून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.
पोस्टर निर्मिती आणि रांगोळी स्पर्धा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या जीवनातील | विविध पैलू यावर पोस्टर तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा - Click Here

गट तिसरा - इयत्ता 9वी ते 12वी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेसाठी कार्यक्रम
कार्यक्रमाचे नाव
१. निबंधलेखन (Essay Writing)
२. वक्तृत्व
३. व्हिडिओनिर्मिती (Videography)
४. दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह
५. एकांकिका
६. एकपात्री अभिनय
७. कथाकथन
८. रांगोळी
विषय
१. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु: तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले
२. सम्राट अशोक आणि भारताची राष्ट्रीय प्रतीके
३. माझी शाळा माझे ग्रंथालय
४. माझ्या घरातील समृद्ध ग्रंथालय
तपशील
निबंधलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा - सोबत दिलेल्या विषयावर निबंधासाठी A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि वक्तृत्वसाठी ३ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.
व्हिडिओ निर्मिती - इंटरनेटवरील फोटोचा वापर करून वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारी ०३ मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी.
दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारे फोटोचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
कथाकथन, एकांकिका व एकपात्री अभिनय आणि रांगोळी स्पर्धा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारा ०३ ते ०५ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा आणि याविषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती
भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वांतत्र्यपूर्व भारताचे मजूरमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्ञानाच्या विविध शाखामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली, त्यांच्यामध्ये लढाऊवृत्ती निर्माण करून समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने मूलभूत कार्य अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रेरणादायी संदेश दिला. विविध भाषा, धर्म, पंथ व जातीमध्ये विभागलेल्या भारताला संविधानाच्या माध्यमातून एक देश म्हणून एकसंध केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकत नाही, असे त्यांचे मत होते. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपुल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके प्रबंध लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी 'राजगृह' नावाचे घर दादर, मुंबई येथे बांधले. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयांवरील हजारो दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकरी घ्या, भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे है शिकवेल, हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.
0 Comments