शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी टॅब सुरु करण्यात आली आहे. इ. 1ली ते इ. 12वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावयाचे आहे. विद्यार्थी प्रमोशन मोबाईल वरुन कसे करावे? याविषयी माहिती पाहूया.
काही शाळांना विद्यार्थी प्रमोशन करताना प्रमोशन टॅबला Click केल्यानंतर इयत्ता व विद्यार्थी संख्या न दिसता वरीलप्रमाणे मेसेज येत आहे. तर काय करावे?
सदर मेसेज खाजगी विनाअनुदानित व अनुदानित शाळांना येत आहे. अशा शाळांनी वर्ग, तुकडी व अनुदान प्रकार इ. माहिती स्कूल पोर्टल मध्ये भरुन शिक्षणाधिकारी यांजकडून मंजूर करुन घ्यावी.
त्यानंतर विद्यार्थी प्रमोशन/अपडेट करता येईल.
School Portal Login
विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? Step by step पहा.
विद्यार्थी प्रमोशन करण्यापूर्वी मागील सर्व रिक्वेस्ट तपासून घ्याव्यात. पेंडिंग रिक्वेस्ट approve करुनच विद्यार्थी प्रमोशन करावे. तुमच्या शाळेतील शेवटच्या वर्गाचे प्रमोशन केलेले विद्यार्थी Dropbox मध्ये जातील.
Step 1
Student Portal login
Step 2
लाल रंगातील Menu येथे टच करणे.
Step 3
Promotion Tab मधील
1st standard to 8th standard
9th standard to 12th standard
वरील दोन पैकी योग्य टॅब निवडा.
Step 5
यानंतर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल. त्यामध्ये आपल्या शाळेतील इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या दिसून येईल. त्यातील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थी संख्येला टच करा.
Step 6
खालीलप्रमाणे विद्यार्थी यादी दिसून येईल. सर्व मुले आपोआप प्रगत असले बाबत दिसून येईल. काही बदल असेल तर तसा बदल करु शकता. इ. 9वी ते इ. 12वी साठी सर्व विद्यार्थ्यांचे शेकडा गुण भरणे आवश्यक असते. सर्व विद्यार्थी एकाच वेळी सिलेक्ट करुन promote या बटनाला टच करा.
Step 7
खालील स्क्रीन प्रमाणे विद्यार्थी प्रमोट झालेले दिसतील. याप्रमाणे सर्व इयत्ता निवडून सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करता येईल. शेवटच्या वर्गाचे प्रमोशन dropbox मध्ये होईल.
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF इ. 2री ते इ. 10वी (20 दिवस)
Bridge Course PDF for Std 2 - Std 10
Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
Step 8
Dropbox student - शेवटच्या वर्गातील विद्यार्थी dropbox मध्ये जातील.
If any query you can message me on 9022226855
0 Comments