Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

स्वच्छता मॉनिटर - प्रोजेक्ट Let's Change अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार | Let's Change चित्रपट सर्व शाळांत दाखविला जाणार

मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट "Let's Change" अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्विकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम 10 जुलै ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट 'Let's Change" अंतर्गत स्वच्छता मॉनिटर उपक्रम हा मुख्यतः इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना केंद्रीत करून राबविण्यात येणार आहे. या सर्व शाळांतील विद्यार्थ्याच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्याथ्यांना "स्वच्छता मॉनिटर" म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी योजना आहे.


त्याअनुषंगाने संक्षिप्त योजना खालीलप्रमाणे. 

1) 2020 पासून अनेक शाळा ऑनलाईन संप्रेषण पध्दतीद्वारे विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ लिंक शेअर करावी. जी विद्यार्थ्यांनी 02 ऑक्टोबर (रविवार) रोजी पहावी. 

2. "स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात येईल. 

3) संदेशानंतर याच लिंकवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट "Let's Change" प्रसारित केला जाईल. 

4) सदर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी "Let's Change" या चित्रपटानंतर लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थ्यांसाठी कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात आली आहे.

5) 03 ऑक्टोबर रोजी कृती आराखड्याबद्दल शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वर्ग शिक्षक यांनी संवाद सत्राचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरक्षण करावे व उपक्रमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती द्यावी.

6) उत्तम कामगिरी करणाऱ्या "स्वच्छता मॉनिटर" यांचा जाहीर सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे. असे कार्यक्रम आयोजित केल्याने स्वच्छता मॉनिटर हो जवाबदारी सातत्याने निभावण्याची उत्सुकता बळकट होऊन विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव निर्माण होईल. 

07. विद्यार्थ्यांना "स्वच्छता मॉनिटर" बनवणे सर्वात योग्य आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होणार व या वयोगटातील विद्यार्थ्यांकडून झालेल्या मनाईबद्दल किवा व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यास नागरिकामध्ये या उपक्रमाचा प्रसार अधिक होईल, यामुळे परिसर स्वच्छ राहील आणि सफाई कर्मचाऱ्यांवरचा भार कमी होईल.


Let's Change हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखविण्यास परवानगी देणेबाबत शासन निर्णय - Click Hereस्वच्छता मॉनिटर संकल्पना

1. विद्यार्थ्यांना "स्वच्छता मॉनिटर' बनवणे सर्वात योग्य आहे कारण कचितच एखाद्या व्यक्तीला लहान मुलाने त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल निदर्शनास आणून दिल्याने नाराजी होईल.
2. मुलांनी दोन-तीन वेळा निदर्शनास आणून दिल्यावर प्रत्येकजण निष्काळजी होण्यास कचरेल
3. परिसर स्वच्छ राहील आणि सफाई कर्मचाऱ्यांवरचा भार बराच कमी होईल.


स्वच्छता मॉनिटर योजनेविषयी सविस्तर माहिती

1. 2020 पासून अनेक शाळा ऑनलाइन संप्रेषण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. शाळा विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करू शकतात, जी विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबर (रविवार) रोजी पाहावी.
2. लिंक वर सुरुवात "स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारण्याच्या कल्पनेचा परिचय माननीय मुख्य मंत्री आणि माननीय उप मुख्य मंत्री साहेब यांच्या विडिओ संदेशा द्वारे करणे योग्य राहील.
3. संदेशानंतर ह्याच लिंक वर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट 'Let's Change" असेल. 
4. 'लेट्स चेंज' या चित्रपटानंतर माननीय शिक्षण मंत्री आणि लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थ्यांसाठी कृती योजना देता येईल.
5. 3 ऑक्टोबर रोजी कृती आराखड्याबद्दल शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वर्ग शिक्षक छोटासा संवाद सत्र घेऊ शकतात. 
6. त्या पुढे सोशल / न्यूज मीडियाद्वारे कृती आराखडा सातत्य राखण्यासाठी पाठपुरावा करू 
7. उत्तम कामगिरी करणाऱ्या "स्वच्छता मॉनिटर" चा सत्कार कार्यक्रम काही दिवसांनी आयोजित केल्याने "स्वच्छता मॉनिटर" ची जबाबदारी सातत्याने निभावण्याची उत्सुकता राहील आणि सवय होईल. कचऱ्याची निष्काळजीपणे विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीवर नियंत्रण असे ध्येय असलेला हा एक गंभीर प्रकल्प आहे. नवीन पिढीला जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हे शिक्षक म्हणून आपले कर्तव्य आहे.प्रकल्प संचालक: रोहित आर्या (संपर्क) ९६८७८ ७७७९९

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी


1. प्रकल्पाच्या गांभीर्याबद्दल सर्व अधिकारी आणि शाळांना संवेदनशील करणे.

2. 30 सप्टेंबर रोजी सर्व शाळांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करणे. 
3. या उपक्रमासाठी जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदार व्यक्ती नियुक्त करणे.

4. प्रकल्प संचालकास सहकार्य आणि जिल्हा समन्वयका सोबत संपर्क करून देणे.

जिल्हा समन्वयकाची जबाबदारी 

1. प्रकल्प संचालकांकडून प्राप्त झालेले अद्यतने आणि सूचना शाळांना कळवणे आणि सक्रिय अंमलबजावणी सुनिश्चित करणे, 
2. सर्व शाळांचा साप्ताहिक अहवाल एकत्रित करून प्रस्तावित स्वरूपात प्रकल्प संचालकांना पाठवणे.

3. 2 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातून सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या 2000 "स्वच्छता मॉनिटर" ची यादी प्रकल्प संचालकांना पाठवणे,

शाळा मुख्याध्यापकांची जबाबदारी


1. महात्मा गांधी जयंतीनिमित्त लेट्स चेंज "स्वच्छता मोनिटर्स या प्रकल्पाविषयी पालकांना माहिती द्यावी.
2. 30 सप्टेंबर / 1 ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करणे
3. या प्रकल्पाचा शाळा समन्वयक म्हणून 1 व्यक्ती नियुक्त करणे,
4. जिल्हा समन्वयकास सहकार्य आणि शाळा समन्वयका सोबत संपर्क करून देणे.

वर्ग शिक्षकांची जबाबदारी


1. सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर 2 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होत असल्याचे कळवावे. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर केला जाईल, जो विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरचा गृहपाठ म्हणून पाहावा.

2. 3 ऑक्टोबर रोजी सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक सत्र करावे. या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि समजला आहे याची खात्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या संदेशांबद्दल आणि Let Change चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारावेत.

3. सर्व वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कळवावे की इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्याथ्यांना कचरा टाकण्याची चूक निदर्शनास आणण्यासाठी स्वच्छता मॉनिटर म्हणून नियुक्त केले जात आहे. कोणत्याही "स्वच्छता मॉनिटर द्वारे निदर्शनास आणल्यास इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले पाहिजे आणि त्यांची चूक सुधारली पाहिजे.

4. इयत्ता 5 वी ते 8 वी च्या वर्ग शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना "स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कच-याची निष्काळजीपणे विल्हेवाट लावणाऱ्यांना त्यांची चूक विनम्रपणे कशी निदर्शनास आणावी याबद्दल चर्चा करून विद्यार्थ्यांच मार्गदर्शन केले पाहिजे.

5. इयत्ता 5 वी ते 8 वी च्या वर्ग शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांशी दर शुक्रवारी (7, 14, 21 ऑक्टोबर) संवादात्मक सूत्र घ्यावे. या सत्रांदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना कचरा टाकण्यापासून थांबवण्याचे अनुभव शेअर करण्यास सांगावे आणि त्यांना 'स्वच्छता मॉनिटर" म्हणून पुढे जाण्यास प्रोत्साहित करावे.

6. विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा साप्ताहिक अहवाल सुचवलेल्या स्वरूपात शाळा समन्वयकासोबत शेअर करावा. वर्ग शिक्षक स्वच्छता मॉनिटर ला एक संक्षिप्त नोट लिहिण्यास सांगू शकतात जी शाळेच्या समन्वयकाद्वारे सोशल मीडियावर शेअर केली जाऊ शकते.

7. 21 ऑक्टोबरपर्यंत वर्ग शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील 2 सर्वात कार्यक्षम स्वच्छता मॉनिटर बद्दल शाळेच्या समन्वयकांना कळवावे. (कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून स्वच्छता मॉनिटर ने कचरा फेकण्यापासून परावृत्त केलेल्या लोकांच्या संख्येवर आणि ज्यांचे संक्षिप्त वर्णन सोशल मीडियावर शेअर केले गेले आहे यावर आधारित) 
8. प्राप्त झालेले अद्यतने आणि सूचनांची सक्रिय अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

Post a Comment

0 Comments

close