जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना - अभ्यासक्रम आराखडा, प्रश्नपत्रिका स्वरुप, दर्जा, काठिण्यपातळी याबाबत स्पष्टीकरण करणारा शासन निर्णय
ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र. एपीटी २०१४/प्र.क्र - १३९/आस्था-८, दिनांक ५ जुलै, २०१४ नुसार जिल्हा परिषदेतील गट-क पदांसाठीचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण स्पष्ट केलेले आहे.
त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक: प्राणिम १२२२ / प्र. क्र- ५४/ का. १३-अ दिनांक ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
75 हजार पदभरती बाबतचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना पहा. - Click Here
दिनांक ५ जुलै, २०१४ चे शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ मध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धीमापन व गणित व तांत्रिक प्रश्न याबाबत प्रश्न व त्याला असणारे गुण निश्चित केलेले आहेत. त्याचबरोबर वरील विषयांची काठिण्य पातळी समजण्याकरता प्रश्नपत्रिकेचा दर्जाही निश्चित केलेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासंदर्भात पुरेसे आकलन होत नव्हते, यावरून उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली गेली होती. त्यामुळे उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, दर्जा निश्चित करणे शासनाच्या विचाराधीन होते.
शासन परिपत्रक :-
ग्राम विकास विभागाकडील शासन परिपत्रक एपीटी २०१४/प्र.क्र - १३९ /आस्था-८ दिनांक ५ जुलै, २०१४ व सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांकः प्राणिम १२२२ / प्र.क्र-५४/ का. १३-अ दिनांक ४ मे २०२२ यांचा विचार करून एकत्रित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत.
परिशिष्ट अ - प्रश्नपत्रिका स्वरूप
संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न, इंग्रजी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न, बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा (काठिण्य पातळी) व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.
परिशिष्ट ब - अभ्यासक्रम आराखडा
ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची काठिण्य पातळी (दर्जा) समजून येणेसाठी व उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.
0 Comments