Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व हस्तलिखित प्रतिज्ञापत्र PDF | तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे व माहिती

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना  स्व हस्तलिखित प्रतिज्ञापत्र व अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती याविषयी माहिती जाणून घेऊया. 

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23




केंद्रप्रमुख भरती ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

(अ) पासपोर्ट साईज फोटो - उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी x ३.५ (सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200X300 pixels

फाईल साईज 20 kb - 50kb 

(ब) स्वाक्षरी - उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 140 X 60 pixels 

फाईल साईज 10kb - 20kb


(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी -  उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमी) पांढऱ्या कागदावर काळ्या / निळया शाई मध्ये स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी. 

आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI

फाइल साइज 20kb - 50kb


ड) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र - उमेदवाराने त्याच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी) पांढऱ्या कागदावर काळ्या / निळ्या शाई मध्ये लिहिलेले अपलोड करणे आवश्यक आहे. 

आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI

फाईल साईज 30kb 100 kb

स्व हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना PDF - Click Here

सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतः च्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल (लिहून न शकणाऱ्या अंथ अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23


केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती

१)पूर्ण नाव 
२)शालार्थ आयडी
३)जात प्रवर्ग 
४)दिव्यांग आहात का ?
५)असल्यास प्रकार 
६)प्रमाणपत्र क्रमांक 
७)धर्म 
८)आधार क्रमांक 
९)परीक्षा केंद्र 
१०)जन्म दिनांक 
११)एसएससी प्रमाणपत्र प्रमाणे नाव 
१२)विवाहित आहात का 
१३)वडिलांचे नाव 
१४)आईचे नाव 
१५)पती किंवा पत्नीचे नाव 
१६)पूर्ण पत्ता पिनकोडसह 
१७)मोबाईल क्रमांक 
१८)ई-मेल आयडी 
१९)शैक्षणिक माहिती 
(अर्हता. विद्यापीठ.  उत्तीर्ण दिनांक. टक्केवारी.  श्रेणी)
१)एस एस सी 
२)एच एस सी 
३)डी एड 
४)पदवी
५)पदव्युत्तर पदवी
६)बीएड
७)इतर

२०)आपण प्राथमिक पदवीधर शिक्षक आहात का ?
२१)आपण प्राथमिक शिक्षक आहात का ?
२२)सध्याच्या जिल्ह्यातील सेवा 
१)सध्याची शाळा
२)जिल्हा 
३)पद
४)रुजू दिनांक 

२३)अवगत भाषा
२४)फोटो
२५)स्वाक्षरी (काळ्या पेनने करावी)
२६)डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
२७)खालील प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी.
I (Name of candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."
"मी ( उमेदवाराचे नाव ), याद्वारे घोषित करती की, मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य, सत्य आणि वैध आहे. मी सदरची कागदपत्रे आवश्यक असत्य तेव्हा सादर करीन."


Post a Comment

0 Comments

close