Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रप्रमूख भरती पात्रता | केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक पात्रता | केंद्रप्रमूख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर २०२5 च्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२5 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. सदर केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 साठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. 



ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23


केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बाबतचा नवीन शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 पहा. - Click Here


केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 पात्रता :


३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

३.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

3.3 जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.


किंवा

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.


३.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

३.४ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.


शासन निर्णय 01 डिसेंबर 2022 प्रमाणे केंद्रप्रमूख भरती शैक्षणिक पात्रता


5. केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता :-


5.1 विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

किंवा

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 

केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बाबतचा नवीन शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 पहा. - Click Here

५.२ वयोमर्यादा :- मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील. 

५.३ स्व जिल्हा :- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.

केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निकष PDF. - Click Here


केंद्रप्रमूख भरती पदोन्नतीने नियुक्तीसाठी पात्रता :- 

ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. 

केंद्रप्रमुख भरती शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बाबतचा नवीन शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 पहा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close