Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परसबाग स्पर्धा 2023 - मूल्यमापन निकष, बक्षिस योजना, परसबाग निर्मितीचे फायदे | प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धा आयोजन

शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता अध्यापनासोबतच शाळेच्या परिसरात शेती पिकविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथील भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरला जावा, असा उद्देश ठेवून शासनाने राज्यभरातील शाळांसाठी परसबाग स्पर्धा घोषित केली आहे.

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नवे नाव दिले असून, योजनेत अनेक बदल सुचविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या परसबागेतील भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे. 

शालेय पोषण आहार योजना नामकरण शासन निर्णय पहा. - Click Here

केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे


परसबाग निर्मितीचे फायदे / हेतू

  1. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होते. 
  2. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. 
  3. ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होतो.
  4. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होतो. 
  5. असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. 


प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ठ परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे २२,९७३ शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत. सन २०२३-२४ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आले आहे.परसबाग निर्मितीबाबत शासनाच्या सूचना

1. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

2. प्रस्तुत उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक/ पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO) सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे. राज्यात उत्कष्ट परसबागा तयार होण्याच्या दृष्टीने सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर आयोजन केल्यास परसबाग निर्मितीस प्रोत्साहन मिळेल. त्यादृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरीता खालीलप्रमाणे विविध स्तरावर बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शालेय परसबाग अंतर्गत मायक्रोग्रीन्स भाजीपाला लागवड करणेबाबत शासन निर्णय - Click Here


असे आहे परसबाग स्पर्धेचे स्वरूप

■ यात सर्वप्रथम केंद्र स्तरावरून उत्तम परसबागांची निवड केली जाणार असून, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तालुकास्तरीय परसबाग स्पर्धा होईल व जानेवारीच्या अखेरीस जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.

■ यामध्ये तालुका स्तरावर प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर जिल्हा स्तरावर अनुक्रमे १० हजार, सात आणि पाच हजारांचे बक्षीस मिळविण्याची प्रत्येक शाळेला संधी आहे.

परसबाग स्पर्धा बक्षिस स्वरूप PDF डाउनलोड करा. - Click Here

परसबाग स्पर्धेचे मूल्यांकन कोण करणार? 

प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मुल्यांकन करण्यासाठी शिक्षण, आहारतज्ज्ञ, कृषी, आरोग्य, अन व औषध प्रशासन विभागातील अधिकारी तसेच स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी. तसेच, उत्कृष्ट परसबागांचे मुल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात यावे.


परसबाग स्पर्धा निकष | मूल्यमापन निकष

स्पर्धेमध्ये १०० गुणांचे निकष तपासले जातील. परसबागेची रचना, हवामानानुसार भाज्यांची लागवड, देशी वाणांचा वापर, कमी पाणी लागणाऱ्या भाज्या, सिंचन पद्धत, सेंद्रिय परसबाग, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी निकषांना गुण दिले जाणार आहेत.


परसबाग स्पर्धा आयोजनाबाबत शासन निर्णय 5 सप्टेंबर 2023 - Click Here

परसबाग स्पर्धा बाबत शासन परिपत्रक - Click Here


परसबाग स्पर्धा मूल्यांकन निकष - Click Here


परसबागेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ यांची मदत घेतली जाणार आहे. जागेची अडचण असल्यास शाळेच्या छतावर किंवा व्हरांड्यामध्ये परसबाग करण्याचे निर्देश आहेत.

Post a Comment

0 Comments

close