Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'पीएम- पोषण' योजना PM POSHAN Scheme | शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पीएम-पोषण) असे होणार

केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पीएम-पोषण) असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता (पीएम-पोषण) नवीन नावानेच ओळखली जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.

पीएम-पोषण - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण

Full Form of PM POSHAN - Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM POSHAN)

प्राथमिक सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने, तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू केली आहे. केंद्राने या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) असे केले आहे. या योजनेच्या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिल्याचे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनांद्वारे कळविले आहे. त्यानुसार या योजनेच्या नावात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, केंद्र सरकारने प्रस्तुत योजनेकरिता दिलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या पत्राप्रमाणे करण्यात येतील, असे शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव झ. मु. काझी यांनी स्पष्ट केले आहे.

PM POSHAN नामकरण बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here


Post a Comment

0 Comments

close