प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणा/बचतगट यांना एलपीजी गॅसचा पुरवठ्यासाठी प्राधान्य देणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी प्रमुख गॅस वितरक कंपनी व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम (BPCL), व्यवस्थापक, हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL), व्यवस्थापक, इंडियन ऑईल (IOC) यांना विनंती केली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सुरु झालेली महत्वकांक्षी योजना आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लाभार्थी आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण ८६२१० शाळांमधील ९५ लाख विद्यार्थ्यांना योजनेचा दररोज लाभ देण्यात येतो.
सद्यस्थितीत जागतिक युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज दि. १०.०३.२०२६ पासून सर्व बचतगट/संस्था यांना हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत गॅस संस्था यांनी एलपीजी गॅस सिलेंडर देण्यास मनाई केलेली आहे, असे राज्यातील कार्यरत असलेल्या बचतगट/संस्था तसेच महानगरपालिका यांनी उपरोक्त संदर्भ क्र.१ व ५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. आखाती युध्दामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्यामुळे शाळांकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारावर परिणाम होत असून विद्यार्थी पोषण आहारपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीएमपोषण योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृहांना साधारणतः दरमहा १.६० ते १.७० लाख एलपीजी गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. त्यामुळे सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी एलपीजी गॅसचा पुरवठा न झालेमुळे आहारापासून वंचित राहू नये, याकरीता राज्यातील शाळास्तरावर/केंद्रीय स्वयंपाकगृह स्तरावर आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणा/बचतगट यांना एलपीजी गॅसचा पुरवठ्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, ही विनंती.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणा/बचतगट यांना एलपीजी गॅसचा पुरवठ्यासाठी प्राधान्य देणेबाबत परिपत्रक Click Here



0 Comments