Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारे व त्यावरील प्रश्न | उतारा क्रमांक 2 - नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे

उतारा क्रमांक 2 - मराठी उतारा व त्यावरील प्रश्न | नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे


हेमा आपल्या बिछान्यावर तिच्या खोलीच्या छताला चिकटवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती. तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. तेच कपडे ती आलटून-पालटून घालत होती. पण एक तर ते फार घट्ट होते किंवा फार तोकडे होते. कपड्यांनी भरलेले कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हते. मग तिला एक अफलातून कल्पना सुचली. तिचे डोळे चमकले आणि ती आपल्या आईच्या खोलीकडे पळाली. "आई गं, मला नवीन कपडे हवेत," ती म्हणाली. "पण माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच. आता जास्त कपड्यांचा ढीग जमवायचा नाही." तिच्या आईने स्मित केले आणि तिला जवळ घेतले. तिची मुलगी दयाळू होती तर!

वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 
1- हेमा आपल्या बिछान्यावर पडली होती; कारण ती. -

1 - दमली होती 

2 - चांदण्यांकडे आवडीने पाहत होती. 

3 - तिला कोणते कपडे घालावेत हे कळत नव्हते. 

4 - ती आळशी मुलगी होती. 


2- तिला आपल्या कपड्यांपैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते. कारण - 

1 - ते फॅशनेबल नव्हते 

2 - ते फार भडक रंगाचे होते 

3 - तिला निवड करता येत नव्हती 

4 - तिला कुठलेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते


3- 'कपड्यांचा ढीग जमवायचा' याचा समानार्थी शब्द - 

1 - कपडे साठवायचे 

2 - कपडे वाटायचे 

3 - कपडे भागीत वापरायचे 

4 - कपडे देऊन टाकायचे


4- हेमा आहे - 

1 - अधाशी 

2 - दानशूर 

3 - आपमतलबी

4 - कंजूष


5- 'दान करणे' याच्या विरुद्धार्थी शब्द आहे - 

1 - देणे 

2 - स्वीकारणे 

3 - खर्च करणे

4 - वाटणे


6- तोकडे असणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

1 - ढगळ असणे 

2 - अपुरे असणे 

3 - लांब असणे 

4 - घट्ट असणे


उतारा क्रमांक 3 व त्यावरील प्रश्न सोडवा


7- खालीलपैकी कोणते विशेषण वरील उताऱ्यामध्ये आलेले नाही. 

1 - तोकडे 

2 - नवीन 

3 - दयाळू 

4 - कल्पनानवोदय उतारे
नवोदय मराठी उतारे
नवोदय उतारे pdf मराठी 
नवोदय उतारे PDF मराठी डाउनलोड
navoday utare
navoday utare pdf marathi
navoday utare pdf marathi download
navoday utare pdf download


शिष्यवृत्ती परीक्षा उतारा वाचन
उतारा व त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षा उतारा व त्यावर आधारित प्रश्न
उतारा व त्यावरील प्रश्न pdf
मराठी उतारा वाचन pdf
मराठी उतारे व प्रश्न

Post a Comment

0 Comments

close