Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मंत्रिमंडळ निर्णय - महाराष्ट्र शासन | Cabinet Decisions - Maharashtra Government

शासन निर्णय आणि मंत्रिमंडळ निर्णय - महाराष्ट्र शासन | अद्ययावत शासन निर्णय आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती येथे उपलब्ध करुन देण्यात येते. 

शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील विविध विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली जाते तसेच इतर महत्वाच्या बाबींसंदर्भातील निर्णय जारी केले जातात. राज्य शासनाच्या विविध विभागांनी वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय तुम्ही शोधू शकता. विशिष्ट विभाग, तारीख किंवा संकेतांकाच्या सहाय्याने तुम्ही हवा असलेला शासन निर्णय शोधू शकता. 


राज्य मंत्रिमंडळाने साप्ताहिक बैठकीत घेतलेले ताजे निर्णयही तुम्हाला वाचता येतील. त्याशिवाय राजपत्रे, आर्थिक सर्वेक्षण, सार्वजनिक सुट्ट्यांची यादी, ई-ऑफीस वापरकर्ता पुस्तिका, अर्थसंकल्पीय भाषण, कार्यक्रम अंदाजपत्रक, संक्षिप्त मासिक लेखे, माहिती तंत्रज्ञान धोरण, नागरिकांची सनद आणि प्राप्त पुरस्कारांचे तपशीलही पाहता येतील.



महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ 

https://www.maharashtra.gov.in


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन - शासन निर्णय (सन 2024) - Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके - Click Here



मंत्रीमंडळ निर्णय महाराष्ट्र शासन

Cabinet Decisions Maharashtra Government

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक शक्यतो दर बुधवारी होते आणि बैठकीतील निर्णय सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले जातात.


मंत्रीमंडळ निर्णय PDF (16-03-2024) - महाराष्ट्र शासन - Click Here

https://bit.ly/Cabinet-Decisions


*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*


👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :*


✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी


✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार


✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला


✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  


✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार


✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 


✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल


✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.


✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना


✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार


✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार


✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान


✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप


✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार


✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन


✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर


✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित


मंत्रीमंडळ निर्णय PDF (13-03-2024) - महाराष्ट्र शासन - Click Here

https://bit.ly/Cabinet-Decisions

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.


👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :*


मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर


पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये


आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ


अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता


✅ केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता


✅ श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार


✅ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प


✅ भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज


राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ


✅ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार


✅ मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार


✅ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार


✅ शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.


मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.


✅ आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.


✅ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.


✅ शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार

११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता


✅ पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार


पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता


म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन


मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार


✅ मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता


✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते


✅ भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार


✅ महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन


✅ जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता


✅ दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना



#मंत्रिमंडळनिर्णय

#MahaNirnay 

#MahaCabinetDecisions

#CabinetDecisions


मंत्रीमंडळ निर्णय PDF (11-03-2024) - महाराष्ट्र शासन - Click Here

https://bit.ly/Cabinet-Decisions


*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*


👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :*


राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता


✅ बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार


✅ बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.


✅ एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी


✅ मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार


✅ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र


जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता


राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद


एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने


✅ विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना


✅ राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प


✅अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड


डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश


✅ मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार


✅ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक


✅ उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ


६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता


✅ आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना


✅ राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता


#CabinetDecisions 

#MahaNirnay

#MahaCabinet


बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे : 10 जानेवारी 2024


✅ राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.


✅ ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी


✅ शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.


✅ 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी


✅ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी


✅ पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत वाढ.


✅ महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार


✅ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी


✅ राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी


#CabinetDecisions

Post a Comment

0 Comments

close