Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माझी शाळा सुंदर शाळा मूल्यमापन निकष (200 गुण) | अ) पायाभूत सुविधा - 38 गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - 101 गुण क) शैक्षणिक संपादणूक - 61 गुण

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी 200 पैकी गुणदान करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या मूल्यमापनाचे निकष माहिती असणे आवश्यक आहे. 



मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान 60 दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी 20० गुण असतील. 

कालावधी - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान 03 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीत असेल. 


"माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान मूल्यांकन निकष PDF -

माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

अ) पायाभूत सुविधा - ३8 गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - 101 गुण
क) शैक्षणिक संपादणूक - 61 गुण

अ, ब, क घटकातील सविस्तर निकष PDF डाउनलोड करा. 

शासन निर्णय - 15 डिसेंबर 2025 मूल्यमापन निकषाबाबत

शासन निर्णय 16 ऑक्टोबर मधील प्रस्तावित केलेले शाळा गुणांकनांचे निकष हे सर्व शाळा व्यवस्थापन / शाळा प्रकार यांना यथास्थित लागू होत नसल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे. प्राप्त प्रस्तावास अनुसरुन ज्या शाळांना 16 ऑक्टोबर च्या शासन निर्णयातील काही विशिष्ट गुणांकन निकष लागू होत नाहीत, त्या शाळांचे गुणांकन केवळ त्यांना लागू होणाऱ्या निकषांच्या गुणांच्या आधारेच करण्याबाबत, आणि अशा प्रकारे शाळांनी प्राप्त केलेले गुण टक्केवारीमध्ये रूपांतरित करून त्या टक्केवारीच्या आधारे शाळांचे मुल्यांकन करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे.


'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 200 गुणांचे मूल्यांकन निकष PDF पहा. - Click Here



Post a Comment

0 Comments

close