सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांनी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. महावाचन उत्सव 2024 नोंदणीसाठी लिंक https://mahavachanutsav.org
Mahavachan Utsav 2024 Registration Link - https://mahavachanutsav.org
मुदतवाढ - "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
'महावाचन उत्सव 2024' या उपक्रमांतर्गत नोंदणी करून माहिती भरण्यासाठी शाळांसाठी सूचना
1. दिलेल्या लिंकवर शाळांनी नोंदणी करून आपली प्राथमिक माहिती भरावी.
2. यात शाळांनी आपले user id व password तयार करायचा आहे.
3. सदर युजर id ने आपल्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करावयाची आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे.
4. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनस्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम पूर्ण करता येईल.
खाली दिलेल्या लिंकवर प्रत्येक शाळेने नोंदणी करावयाची आहे.
शाळा नोंदणी कालावधी - दि.१६/०८/२०२४ ते दि. २३/०८/२०२४ पर्यंत
विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. २७/०९/२०२४ पर्यंत
मुख्यध्यापकांनी लेखन / व्हिडिओ अपलोड करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. २७/०९/२०२४ पर्यंत
महावाचन उत्सव नोंदणी लिंक - https://mahavachanutsav.org
Maha Vachan Registration Link - https://mahavachanutsav.org
महावाचन उत्सव 2024 प्रमाणपत्र डाउनलोड लिंक - Click Here
महावाचन उत्सव संपूर्ण मार्गदर्शक Video पहा. - Click Here
महावाचन उत्सव प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे? Video पहा. - Click Here
महावाचन उत्सव 2024 portal login click here
महावाचन उत्सव 2024 portal click here
महावाचन उत्सव 2024 पोर्टल click here
महावाचन उत्सव नोंदणी लिंक click here
महावाचन उत्सव नोंदणी कशी करावी? Click Here
Mahavachan utsav portal link
Mahavachan utsav registration link
Mahavachan utsav portal
Mahavachan utsav 2024 portal
महावाचन उत्सव 2024
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचा कालावधीः-
दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.
महावाचन उपक्रमाची व्याप्ती :-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३री ते १२वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी गट अ - इयत्ता ३री ते ५वी, गट-ब-इयत्ता ६वी ते ८वी व गट-क-इयत्ता ९वी ते १२वी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहेत.
महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचे स्वरुपः-
i) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
ii) या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.
iii) सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल.
iv) सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.
v) वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय / खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
0 Comments