राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांनी गणित विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन गणित वेबिनार सत्रासाठी उपस्थित राहणेबाबत आदेशित. ऑनलाईन गणित वेबिनार सत्राचे आयोजन दि.१७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील गणित अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. महाराष्ट्र, पुणे व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयासाठी ऑनलाईन गणित वेबिनार सत्राचे आयोजन दि.१७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे.
ऑनलाईन गणित वेबिनार - SCERT चे परिपत्रक डाउनलोड करा.- Click Here
सदर वेबिनार सत्रामध्ये गणित विषयाचे अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे :
महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी सहकार्यात्मक भागीदारी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या गणित साहित्याचे शिक्षकांकडून उपयोजन
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने खान अकॅडमीकडून सहकार्य व आवश्यक तयारीसाठी मार्गदर्शन
विद्यार्थी संपादणूकीचे मूल्यांकन
मुख्याध्यापक व शिक्षक भूमिका
शिक्षकांसाठी खान अकॅडमीचा कोर्स (Basic / Advance) - Click Here
Teacher's Hand Out - Click Here
ऑनलाईन गणित वेबिनार सत्र यूट्यूब लिंक
ऑनलाईन गणित वेबिनार लिंक -
https://www.youtube.com/live/nnI7BQPOuq4?si=yinr6v5Tz9r8KfTt
Attendance & Training Feedback Form
उपस्थिती आणि प्रशिक्षण फीडबॅक फॉर्म
सदर ऑनलाईन वेबिनार सत्राबाबतची माहिती आपल्या अधिनस्थ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, संबंधित शाळा, मुख्याध्यापक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन वेबिनार सत्रास संबंधितानी वेळेवर उपस्थित राहणेबाबत निर्देशित करण्यात यावे.
0 Comments