Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दांडपट्टा माहिती मराठी | दांडपट्टा शस्त्राचा वापर | दांडपट्टा किंवा पट्टा

दांडपट्टा किंवा पट्टा हे एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. सरळ लांब दुधारी पाते व त्यास पकडण्यासाठी असलेला खोळबा म्हणजे संपूर्ण कोपरापर्यंतचा हात पूर्णपणे धातूच्या आच्छादनाने झाकला जाईल, अशी मूठ असणारे शस्त्र म्हणजे "दांडपट्टा" होय.



दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. 


दांडपट्टा शस्त्राचा  वापर

जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.


दांडपट्टा ऐतिहासिक संदर्भ

प्राचीन संस्कृत साहित्यात याचा उल्लेख "पट्टीश असा असून संत ज्ञानेश्वरांनी पट्टा या शस्त्राचा उल्लेख "खड्ङ्गलतिका" म्हणजेच वेलीप्रमाणे लवचिक पाते असलेली तलवार असा केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असणाऱ्या शिवभारत, सभासद बखर व राज्यव्यवहार कोष, अनेक बखरी व ऐतिहासिक साहित्यात "पट्टा" या शस्त्राचा उल्लेख आढळतो. सभासद बखरीमध्ये पट्ट्याचा कुशल वापर करणाऱ्यास "पटाईत" असे संबोधलेले आहे. समकालीन पोवाड्यांमध्ये तसेच समकालीन साहित्यातील अनेक घटनांमध्ये मराठा सरदार व मावळ्यांनी "पट्टा" हे शस्र वापरल्याचे दिसून येते.

अनेक आंतरराष्ट्रीय संशोधकांनी "पट्टा" हे मराठ्यांचे आवडते शस्त्र असल्याचे नमूद केले आहे, तसेच राजस्थानातील अलवार येथील संग्रहालयात पट्ट्याची माहिती मराठ्यांचे प्रमुख शस्त्र म्हणून दिलेली आहे. 


दांडपट्टा वर्तमान स्थिती

महाराष्ट्रात पट्टयाचा वापर साहसी खेळांमध्येही होत असून युद्धांबरोबरच समारंभाच्या आणि सणांच्या प्रसंगी दांडपट्ट्याची साहसी प्रदर्शने होत आहेत. आजही महाराष्ट्रात मर्दानी खेळ या युद्धकला आखाड्यांमध्ये दांडपट्टा हाताळणे शिकवले जाते. अर्थात "दांडपट्टा" चालवणे ही महाराष्ट्राची आजही जिवंत असणारी लोकसंस्कृती आहे. 



महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र - दांडपट्टा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला 'राज्य शस्त्र' म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. शासन निर्णय पहा. Click Here


Dandapatta Marathi Information

दांडपट्टा मराठी माहिती

Dandapatta information marathi

दांडपट्टा माहिती मराठी

महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र कोणते? दांडपट्टा

महाराष्ट्र राज्य शस्त्र

शिवकालीन हत्यारे

Post a Comment

0 Comments

close