NPS, GPS नको OPS च हवी | NPS मध्ये सुधारणा नको तर 1982 व 84 ची जुनी पेन्शन योजनाच पूर्ववत हवी | जुनी पेंशन योजनाच लागू करण्याची संघटनेची मागणी
राज्यातील तमाम NPS / DCPS धारक बांधवांनो...
पुन्हा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे म्हणून वेळेवर जागे व्हा.
सरसकट जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला बगल देऊन तुमच्या माथी पुन्हा एक बेभरवशाची पेन्शन योजना माथी मारत आहेत.. त्याच गोंडस नामकरण त्यांनी GPS ( ग्यारंटेड पेन्शन स्कीम ) असं केलेले आहे.. आणि त्यात 50% पेन्शन मिळेल असा गाजावाजा करून ही योजना ते आपल्या माथी मारत आहेत..
अंतिम वेतनाच्या 50% पेन्शन च्या बाता मारणारे आपली निव्वळ फसवणूक करत आहेत.
जुनी पेन्शन योजना आणि ही GPS ( Garented pension scheme ) नावाची हायब्रीड पेन्शन योजना यातील फरक खालील मुद्द्यांवरन समजून घ्या.
१)जुनी पेन्शन योजनेत पेन्शन मिळण्यासाठी कोणतीही कपात होत नाही.
- तर GPS योजनेत NPS प्रमाणे 10% कपात सुरू राहील.
२) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1982 च्या जुनी पेन्शन योजनेत(OPS) शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळण्यासाठी केवळ 10 वर्ष सेवा पुरेशी आहे.
- तर या हायब्रीड पेन्शन योजनेत 30 वर्षं सेवेची अट असणार आहे..
३) नियतवयोमानापूर्वी स्वेच्छा सेवानिवृत्ती(VRS) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत 20 वर्ष सेवा पुरेशी आहे, ज्यात शेवटच्या 3 वर्षाच्या सरासरी वेतनाच्या 50 % एवढी पेन्शन दरमाह मिळते.
- तर या हायब्रीड GPS योजनेत तसा कोणताही नियम नाही..
४)1982 च्या जुन्या पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात, दर 10 वर्षात नवीन वेतन अयोगानुसार पेन्शन पुनर्रचना करण्यात येते, ज्यात पेन्शन बेसिक जवळपास दुप्पट वाढत असते.
- तर या हायब्रीड GPS योजनेत नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन पुनर्रचना होण्याचा काही संबंध नसणार.
त्यामुळे ज्या पेन्शन बेसिकवर कर्मचारी निवृत्त झाला असेल तो आजीवन त्याच बेसिक वर पेन्शन घेईल.. यामुळे ops धारकांच्या पेन्शन च्या तुलनेत 4/5 पट मागे असेल.
५)जुन्या पेन्शन योजनेत दर 6 महिन्याला पेन्शन वर महागाई 5 ते 6% भत्ता वाढत असतो. तर या GPS योजनेत DA वाढ नसणार आहे.
६) जुन्या पेन्शन योजनेत वयाच्या 85 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन बेसिक मध्ये 15% पेन्शन वृद्धी होते, 90 व्या वर्षी 30% वाढ तर 100 व्या वर्षी 50% पेन्शन वाढ मिळते.
- तसा लाभ या GPS रुपी हायब्रीड पेन्शन योजनेत मिळू शकत नाही...
७) जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन चे अंशराशिकरण नियम आहे, ज्यात पेन्शन विक्री करता येते, ज्यामुळे एका विशिष्ट कालावधी नंतर पेन्शन विक्रीकरून एकरकमी 5 ते 6 लाख रु सेवानिवृत्त कर्मचारी घेऊ शकतो.
तसा कोणताही लाभ या नवीन GPS मध्ये नसेल...
एकंदरीत GPS योजना ही जुनी पेन्शन योजना नाहीच ती NPS चे च दुसरे रूप आहे, GPS म्हणजे NPS 2.0 आहे,
GPS च्या नावाखाली एवढा सगळा गौडबंगाल असताना, कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असताना काही संघटना अजूनही कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत,
➡️ तथाकथित 50% पेन्शन साठी NPS अंतर्गत 10% कपात सुरू ठेवण्याचा जावई शोध आणि मागणी काहीजण निर्लज्जपणे करीत आहेत.
➡️ एकीकडे म्हणताय 10% कपात सुरू ठेऊन 24% कपात रक्कम NSDL कडे वर्ग करा, आणि दुसरीकडे म्हणताय स्वतंत्र इंडेक्स फंड ची निर्मिती करा।
➡️ आजरोजी PFRDA (NSDL) कडे गेलेली रक्कम राज्य शासनाला GPS योजनेसाठी मिळण्याची कोणतीही तरतूद नाही.
PFRDA ची रक्कम तेव्हाच मिळते जेव्हा NPS समाप्त होऊन OPS लागू होते. त्याशिवाय NPS रक्कम शासन किंवा कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही..
➡️ मग असं असतांना सेवानिवृत्तीवेळी NSDL (PFRDA) आपल्या जी 60% रक्कम देईल ती रक्कम हे इंडेक्स फंड मध्ये गुंतवणार आहेत का.?
कारण उर्वरित 40% रक्कम NSDL राज्य शासनाला कधीही देणार नाही, तसा नियम नाहीच..
एकंदरीत आपली आयुष्यभर कपात झालेली 10% रक्कम हडप करून आपल्याला GPS अंतर्गत पेन्शन द्यायची असे हे मनसुबे आहेत..
बरं समजा आपण ती आयुष्यभराची 10 % रक्कम यांना देऊन टाकली तरी , प्रत्येकाला 50% पेन्शन मिळणार का.?
ज्यांची कोणतीही कपात झालेली नाही, ज्यांची NPS मध्ये रक्कमच नाही त्यांना हे काय देणार.?
उशिरा नोकरीत लागलेले, किंवा उशिरा सेवेत कायम झालेले ज्यांची सेवा 10-12 वर्ष झाली आहे त्यांना काय मिळणार.?
ज्यांना 20 वर्षा नंतर स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आहे, त्यांना काय मिळणार.?
जे कोणत्याही DCPS/NPS कपाती विना सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना हे काय देणार.?
याचं कोणतंही उत्तर यांच्याकडे नाही व नसेल आणि याचं उत्तर यांनी देण्याचा प्रयत्न केला तरी ते वास्तवावर टिकणारे नसेल.
आणि याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे या तथाकथित 50% पेन्शन वर DA ची वाढ मिळणार नाही, हे मात्र जाणीवपूर्वक हा विषय लपवला जात आहे, जेणेकरून हे भविष्यात 'आता DA साठी लढा लढू..' असा घर भरण्याचा उपक्रम यांना मिळेल..
सोबतच जर सरकार ला जर असं वाटतंय की ते या हायब्रीड पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन देणार आहे तर मग 1982 चीच जुनी पेन्शन योजना नियमावली लागू करायला काय अडचण आहे.?
मित्रांनो जसा धोका 2004/05 साली DCPS/NPS लागू करताना झाला, NPS मध्ये लाखों कोटी रु मिळतील , सोबत पेन्शन असे जे स्वप्न त्यावेळी दाखवले तसाच आता ही होतय आणि काही बेगडी लोकं तेव्हा जसं NPS किती छान आहे हे सांगितले गेले तसे आता देखील सांगित आहेत, की GPS कशी योग्य आहे ते.
जी गत NPS / DCPS ची झाली होती तीच गत या हायब्रीड पेन्शन योजनेची होणार आहे..
वेळीच जागी व्हा, नाहीतर OPS च नाव करून आलेला GPS बहुरूपी परत एकदा फसवल्या शिवाय राहणार नाही.
एकच मिशन जुनी पेन्शन..
विनायक चौथे
राज्य सोशल मीडिया प्रमुख
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
0 Comments