शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वाशीम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळा आणि नाशिकमधील एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव ढगा या शाळांना पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत स्पर्धेतील विजेत्या शाळांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तर विजेत्या शाळा - (शासकीय गट)
राज्यस्तर विजेत्या शाळा -इतर आस्थापनांच्या शाळा
राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त शाळा - जि. प. शाळा साखरा जि. वाशिम
विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२३ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी कालावधीत राज्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात सरकारी आणि खासगी व्यवस्थापनाच्या एकूण एक लाख तीन हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळांमधील एक कोटी ९९ हजार ६१ हजार ५८६ विद्यार्थदेखील अभियानात सहभागी झाले. अभियानांतर्गत शाळांचे विविध स्तरावर मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनाच्या आधारे राज्यस्तरीय, बृहन्मुंबई महापालिका, 'अ' आणि 'ब' वर्ग महापालिका, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अशा स्तरावरील पारितोषिक शिक्षण विभागाने जाहीर केले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गतच्या स्पर्धेत सरकारी शाळा गटातून वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता. वाशिम) येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेने राज्यात ५१ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे.
My school beautiful school मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा या अभियानात राज्यातील १ लाख ३ हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविला होता. शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यातील १ लाख ३ हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविल होता. शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मुल्यांकन करण्यात आले. ३ मार्च रोजी बक्षिस जाहिर झाले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील साखरा (ता. वाशिम) येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. मंगळवार, ५ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
राज्यात वाशिमचे नाव चमकले
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात वाशिम जिल्ह्यातील शाळांची कामगिरी उत्कृष्ट राहावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश आहाळे यांनी शाळांना प्रोत्साहन दिले होते. साखरा शाळेचे मुख्याध्यापक राजू महाले यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून मेहनत घेतली. साखरा शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाल्याने, या मेहनत व परिश्रमाचे चीज झाले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात राज्यात वाशिमचे नाव चमकले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
राज्याचे शिक्षण आयुक्त मांढरे म्हणाले, "शालेय शिक्षण विभागातर्फे 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत गौरव पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी (ता. ५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या टाटा थिएटरमध्ये दुपारी एक वाजता होईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.







0 Comments