प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सुट्टीच्या कालावधीतील धान्य व धान्यादी माल कोरडा शिधा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण संचालक यांनी नुकतेच आदेश काढलेले आहेत.
विद्यार्थ्यांना पूरक आहार अंतर्गत विविध प्रकारचे पदार्थ देणेबाबत शासन परिपत्रक
राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने संदर्भिय पत्रातील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. तसेच संदर्भिय पत्रान्वये संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.
विद्यार्थ्यांना 22 एप्रिल पासून सुट्टी देणेबाबत शासन निर्णय
शाळांना 02 मे पासून सुट्टी देणे बाबत शासन निर्णय पहा.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल (कोरडा शिधा) स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार दि. 22 एप्रिल ते 01 मे पर्यंत च्या कालावधीतील कोरडा शिधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
0 Comments