राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2025-26 इ.8वी साठी परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी / निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. Download NMMS Selection list / Merit list 2025-26
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच pdf - Click Here
मंथन परीक्षा गुणवत्ता यादी | Manthan Exam state wise merit List
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे.
इ. ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
NMMS Exam नमूना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सन 2015 ते 2025 पर्यंत
NMMS Exam 2025-26 विद्यार्थी निहाय गुण यादी डाउनलोड करा. Click Here
NMMS परीक्षा 2026 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
NMMS परीक्षा 2026 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी प्रवर्ग निहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
NMMS परीक्षा 2026 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी जिल्हानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
NMMS Selection list School Login
NMMS Exam Result 2026 | विद्यार्थी निहाय गुण यादी 2026
दिनांक २8 डिसेंबर, २०२5 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २50745 विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्ह्यानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व
https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक 24.०४.२०२6 रोजी पासून पाहता येईल.
➤ सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.
➤ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
NMMS Exam 2026 ची अंतिम उत्तरसूची डाउनलोड करा.



0 Comments