इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी, इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन मुलांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉईंट, आकर्षक कागदी टोप्या तयार करणे आवश्यक आहे. शाळापूर्व तयारी अभियान सेल्फी पॉईंट विविध नमुने आपण येथे पाहू शकता.
शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 1 व 2 आयोजन करणेबाबत
शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन पहिला मेळावा 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मेळावा क्र. 2 चे आयोजन जून महिण्यात करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान 1 ते 8 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.
0 Comments