Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेंशन - वस्तीशाळेवर करार पध्दतीने मानधनी तत्वावर नियुक्त वस्तीशाळा स्वयंसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत

दि.१ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार वस्तीशाळेवर करार पध्दतीने मानधनी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वस्तीशाळा स्वयंसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत 

संदर्भ:- मा. उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.२९/टीएनटी-६, दि.१३/३/२०२४


उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्रान्वये मा. श्री. कपिल पाटील, विधान परिषद यांनी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि.१/०३/२०१४ नुसार वस्तीशाळेवर करार पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वस्तीशाळा स्वयंसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत विनंती केली आहे. सदर पत्रावर मा. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांनी प्रधान सचिव कृ. तपासून तात्काळ सादर करावे असे निर्देश दिले आहेत.


उपरोक्त मा.श्री. कपिल पाटील विधान परिषद यांचे निवेदन व त्यावर मा. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांनी दिलेल्या निदेशाच्या अनुषंगाने खालील नमूद मुद्दयाबाबत आपले अभिप्राय / अहवाल तात्काळ सादर करण्यात यावेत.


दि.१ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत शासनाने सदर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यात वस्तीशाळा स्वयंसेवक नियमित शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांची माहिती खालील प्रपत्रात तात्काळ सादर करावी. 

माहिती परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



मा.श्री. कपिल पाटील विधान परिषद यांचे पत्र

Post a Comment

0 Comments

close