राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत संचालक यांचे परिपत्रक
शिक्षण सप्ताह Geo tag सह फोटो अपलोड लिंक
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्र सरकार द्वारे राज्यांना कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
शिक्षण सप्ताह कालावधी - २२ ते २८ जुलै, २०२४
शिक्षण सप्ताह निमित्त आयोजित करावयाचे उपक्रम
शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे. परिशिष्टे (Annexure) 1 ते 7 प्रमाणे दिलेले उपक्रम दर दिवशी राबवावेत.
दिवस पहिला - सोमवार, दि. २२/०७/२०२४
अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (Annexure-1)
दिवस दुसरा - मंगळवार, दि. २३/०७/२०२४
मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (Annexure-2)
दिवस तिसरा - बुधवार, दि. २४/०७/२०२४
क्रीडा दिवस (Sports Day) (Annexure-3)
दिवस चौथा - गुरुवार, दि. २५/०७/२०२४
सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (Annexure-4)
दिवस पाचवा - शुक्रवार, दि. २६/०७/२०२४
कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (Annexure-5a and 5b)
दिवस सहावा - शनिवार, दि. २७/०७/२०२४
मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस (Eco clubs for Mission Life/ School Nutrition Day) (Annexure-6)
Eco club for mission life GR - click here
School Nutrition day GR - click here
दिवस सातवा - रविवार, दि. २८/०७/२०२४
समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day (Annexure-7)
Download Annexure 1 to 7 - Click Here
शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविणेबाबत सूचित केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.
तरी उपरोक्त प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात.
0 Comments