Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महावाचन उत्सव 2024 विद्यार्थी मूल्यांकन निकष व कालावधी | Mahavachan Utsav 2024 Evaluation Criteria

सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महावाचन उत्सव 2024 मूल्यांकन निकष व कालावधी बाबत माहिती जाणून घेऊया. 

"महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचा कालावधीः-

दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.

Mahavachan Utsav 2024 Evaluation Criteria and duration


महावाचन उत्सव 2024 शाळा नोंदणी -

दि.१६/०८/२०२४ ते दि. २३/०८/२०२४ पर्यंत

विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. ३०/०८/२०२४ पर्यंत

मुख्यध्यापकांनी लेखन / व्हिडिओ अपलोड करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. २९/०८/२०२४ पर्यंत

महावाचन उत्सव विद्यार्थी लेखन / व्हिडिओ लिंक - Click Here


महावाचन उत्सव 2024 मूल्यांकन कालावधी - 

दि. २१/०८/२०२४ ते दि.१५/०९/२०२४ पर्यंत


शाळास्तर मूल्यांकन कालावधी

दि. २१/०८/२४ ते दि. ३०/०८/२४


तालुकास्तर मूल्यांकन कालावधी

३१/०८/२४ ते ०६/०९/२४


जिल्हास्तर मूल्यांकन कालावधी

०७/०९/२४ ते ११/०९/२४


राज्यस्तर मूल्यांकन कालावधी

१२/०९/२४ ते १५/०९/२४



महावाचन उत्सव 2024 मूल्यांकनाचे स्वरुप

महावाचन उत्सव-२०२४ या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनांचे मूल्यांकन खालील प्रमाणे करावे.

विषयाची निवड व लिखाणाची पध्दत (३ गुण):-

विद्यार्थ्यांने वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकांचा विषय, लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा, शुध्दलेखन, हस्ताक्षर, नीटनेटकेपणा इ.

आकलन व अभिव्यक्ती (५ गुण) :

विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेवून गुणांकन करावे.

विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकांचा परिचय स्वभाषेत करणे, पुस्तकाबाबतचे मत, विद्यार्थ्यांची वैचारिक भूमिका इ.

मुखपृष्ठ, मलपृष्ठ, चित्रे, फोटो, आकृत्या इ. बाबत मत (२ गुण): 

पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, अंतरंगातील चित्रे, फोटो, आकृत्या इ. बाबतचे मत.



उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे १० च्या मर्यादेत शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करावे. शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे. शाळांनी आपल्यास्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थीची निवड करावी. प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठवावी. प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जिल्ह्यास कळविण्यात यावे.

तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर (मनपासह) प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.

जिल्ह्यांकडून पात्र विद्यार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.


महावाचन उपक्रमाची व्याप्ती :-

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३री ते १२वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी गट अ - इयत्ता ३री ते ५वी, गट-ब-इयत्ता ६वी ते ८वी व गट-क-इयत्ता ९वी ते १२वी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments

close