ईद-ए-मिलाद सुट्टी 2024 | Eid-E-Milad Holiday | मुबंई शहर व मुंबई उपनगर मध्ये 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी जाहीर | इतर जिल्ह्यात सुट्टी कधी घ्यावी हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे.
क्रमांक सार्वसु-११२४/प्र.क्र.१०६/२०२४/जपुक (२९). - शासनाने सन २०२४ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना, क्र.सार्वसु. ११२३/प्र. क्र.१४८/कार्या-२९, दि.०९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.
२. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.
३. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.
जळगाव - 18 सप्टेंबर रोजी सुट्टी
धुळे - 16 सप्टेंबर रोजी सुट्टी
ईद ए मिलाद सुट्टी बाबत शासनाची अधिसूचना डाउनलोड करा. Click Here
0 Comments