प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक Chakrika app download link | चक्रिका ॲप डाउनलोड लिंक
what is chakrika app?
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची घोषणा करण्यात आली असून मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवार रोजी घेण्यात येणार आहे. सदर निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नियुक्त सर्व निवडणूक कर्मचाऱ्याने चक्रिका ॲप डाउनलोड करणे बंधनकारक आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे लोकेशन कळावे यासाठी मोबाइलमध्ये चक्रीका ॲप डाऊनलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चक्रिका ॲप मतदानाच्या आदल्या दिवशी १९ नोव्हेंबरला व मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला सुरू ठेवणे अनिवार्य असेल. या ॲपमुळे मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते कळणार असून प्रशासनाला उपाययोजना करणे सोपे होईल. चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर करता येईल, अशी माहिती देण्यात आली.
Chakrika app download link
Chakrika mobile app download link
https://play.google.com/store/apps/details?id=gov.orsac.chakrika
0 Comments