Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार त्रिभाषा धोरणासाठी समिती गठित | त्रिभाषा धोरण समिती प्रश्नावली

इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आले होते. ते रद्द करुन त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून कशाप्रकारे लागू करावयाचे याचा अभ्यास करून धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे


त्रिभाषा धोरण समिती प्रश्नावली

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व स्तरातील जनतेच्या अपेक्षा सदर प्रश्नावलीद्वारे जाणून घेण्यात येत आहेत.


त्रिभाषा धोरण प्रश्नावली - मराठी माध्यम

त्रिभाषा धोरण प्रश्नावली - इंग्रजी माध्यम

त्रिभाषा धोरण प्रश्नावली - हिंदी व इतर माध्यम


त्रिभाषा धोरण प्रश्नावली लिंक





त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात गठित समितीस एक महिन्याची मुदतवाढ देणेबाबत शासन निर्णय १5 डिसेंबर 2025 - Click Here

शासन निर्णय दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५ अन्वये त्रिभाषा धोरण समितीस शासनास अहवाल सादर करण्याकरिता देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदत दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. तथापि समितीचे सद्यस्थितीतील कामाकाजाप्रीत्यर्थ सुरु असलेले दौरे व इतर अनुषंगिक कामकाज विचारात घेता, समितीच्या कार्यकाळास दिनांक ०५ डिसेंबर, २०२५ पासून दिनांक ०४ जानेवारी, २०२६ या कालावधीसाठी (एक महिना) मुदतवाढ देण्यात येत आहे. समितीने आपला अहवाल दिनांक ०४ जानेवारी, २०२६ पर्यंत शासनास सादर करावा.

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. GR - 06/10/2025 - Click Here


त्रिभाषा धोरण लागू करण्यासाठी समिती सदस्य निवड GR - 05/09/2025

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षणतज्ज्ञ, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे. 

त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती सदस्य

१. डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती  - सदस्य

२. डॉ. वामन केंद्रे, संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)  - सदस्य

३. डॉ. अपर्णा मॉरिस, शिक्षणतज्ज्ञ, पुणे  - सदस्य

४. श्रीमती सोनाली कुलकर्णी - जोशी, भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे  - सदस्य

५. डॉ. मधुश्री सावजी, शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर  - सदस्य

६. डॉ. भूषण शुक्ल, बालमानसतज्ज्ञ, पुणे  - सदस्य

७. श्री. संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई - सदस्य सचिव

उपरोक्त समितीने संदर्भाधीन दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करावे व त्रिभाषा धोरणांसदर्भातील अहवाल या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करावा.




त्रिभाषा धोरण लागू करण्यासाठी समिती गठित GR - 30 जून 2025

इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भाषेचा समावेश करण्यात आल्यामुळे यासंदर्भात राज्यामध्ये विविध स्तरावर होत असलेल्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक २९.०६.२०२५ रोजीच्या पत्रकार परिषदेमध्ये, मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दोन्ही संदर्भाधीन शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून धोरण निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्याची घोषणा केलेली आहे. त्यास अनुसरुन त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून कशाप्रकारे लागू करावयाचे याचा अभ्यास करून धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे समितीमधील अन्य सदस्यांची नियुक्ती शासनामार्फत लवकरच करण्यात येईल. 

ही समिती राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करेल तसेच सर्व संबंधित घटकांशी / संस्था /व्यक्ती यांच्याशी सांगोपांग चर्चा करून राज्य सरकारला शिफारस करेल. ही समिती देशातील ज्या राज्य /केंद्रशासित प्रदेश यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० स्वीकारले आहे, त्यांनी अवलंबिलेल्या त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करेल. सदर समिती विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन आपला अहवाल शासनास तीन महिन्यांच्या आत सादर करेल. समितीचा अहवाल विचारात घेऊन, त्रिभाषा सूत्रासंदर्भात शासनस्तरावरून उचित निर्णय घेण्यात येईल.

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित करणेबाबत शासन निर्णय (30 जून 2025) डाउनलोड करा. Click here


हिंदी भाषा सक्ती रद्द

हिंदी भाषा सक्ती करणारे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हिंदी सक्ती बाबतचे 16 एप्रिल व 17 जून 2025 चे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्रिभाषा धोरणासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव असतील. 



शासन निर्णयातील 16 एप्रिल 2025 मधील अनु. क्र. ३ येथील 'भाषाविषयक धोरण' या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे:-


"राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता ६ वी ते १० वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल."


या ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे :-

"राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल; परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना तो भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि, हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील. हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पध्दतीने शिकविण्यात येईल. 


सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल. या कार्यवाहीसंबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यास्तरावरून तात्काळ करण्यात येईल. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता ६ वी ते १० वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल."


२. सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०६१७२२३३५९३४२१ असा आहे. हे शासन शुध्दिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

हिंदी भाषा सक्ती बाबत शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here





पहिलीपासून हिंदीची सक्तीच

अखेर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य आहे. या तिसऱ्या भाषेसाठी हिंदी हा एक पर्याय असेल. पण हिंदी नको असेल, तर वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेची निवड करणे अपेक्षित आहे. अन्यथा हिंदी भाषाच शिकावी लागणार आहे. ही एकप्रकारे हिंदीची सक्ती असल्याची टीका शिक्षणतज्ञ करत आहेत.

Post a Comment

0 Comments

close