Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

01 ते 15 नोव्हेंबर "जनजाती गौरव पंधरवडा" | 15 नोव्हेंबर "जनजाती गौरव दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार

भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये "जनजाती गौरव पंधरवडा" व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिवस" साजरा करण्यात येणार आहे. 


शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी १५ नोव्हेंबर हा दिवस, देशाचे आदर्श स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस, सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात आणि सांस्कृतिक वारसामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये "जनजाती गौरव पंधरवडा" व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिवस" साजरा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.


आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Tribal Affairs) दिनांक २४.१०.२०२५ च्या पत्राद्वारे कळवले आहे की, दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करावा. जनजाती गौरव दिवस (JJGD) २०२५ आणि भारतीय समाज आणि वारसामध्ये आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी, ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांद्वारे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांची एक उदाहरणात्मक यादी जोडली आहे (परिशिष्ट-१). राज्ये/केंद्रशासित प्रदेश सूचक यादीतील उपक्रम समाविष्ट करु शकतात आणि खालील व्यापक विषयांना समाविष्ट करण्यासाठी या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरुप देऊ शकतात. 

सामाजिक आर्थिक विकास आणि जागरुकता.

शिक्षण आणि कौशल्य विकास.

उपजीविका आणि निरोगीपणा.

कला, संस्कृती आणि वारसा.

पायाभूत सुविधांचा विकास.

प्रशासन आणि संस्थात्मक बळकटीकरण.


या संदर्भात प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेश संघटनेकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि (is7section@gmail.com) या ई-मेलवर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाल कळविण्यात यावे असे सदर पत्रात नमूद केले आहे. या नोडल अधिकाऱ्यांना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या जनजाती गौरव दिवस कालावधीमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनाचे समन्वय करावे लागेल, त्यांनी सदर कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडियोज आणि कार्यक्रमांचे तपशील या बाबी विहित पोर्टलवर (https://adiprasaran.tribal.gov.in/jigd/home.aspx.) अपलोड करण्याची कार्यवाही करावी.


मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी देखील त्यांच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी "जनजाती गौरव दिन" सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्याची विनंती केलेली आहे.


जनजाती गौरव पंधरवडा दिवसनिहाय उपक्रम




शिक्षण मंत्रालयाच्या सूचनांनुसार दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करण्यात यावा.


01 ते 15 नोव्हेंबर "जनजाती गौरव पंधरवडा" | 15 नोव्हेंबर "जनजाती गौरव दिवस" म्हणून साजरा करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close