Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बदली 2025-26 अपडेट | जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली अपडेट | जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार करणेबाबत

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2025-26 च्या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक 07 नोव्हेंबर च्या परिपत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षक बदली 2025-26 अपडेट | जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली अपडेट 



जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here

आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/





Help Desk - OTT Support numbers :
ऑनलाईन बदलीबाबत vinsys सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्वाचे नंबर व इमेल - 
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.

 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/



New Update - 04 November 2025
सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहीत मुदतीमध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्यामुळे, बदलीपात्र/बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचुकता नसल्यामुळे तसेच रिक्त पदांची माहिती अचूक न भरल्यामुळे उद्भवलेली आहेत. या सर्वाच्या परिणाम स्वरुप सदर बदली प्रक्रिया ही दि.३१ मे, २०२५ पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विविध न्यायालयीन प्रकरणास शासनास सामोरे जावे लागले.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ बाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.१२१४०/२०२५ व अन्य संलग्न याचिकांवर मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.२३.९.२०२५ रोजी दिलेल्या न्याय-निर्णयामध्ये प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी सन २०२६-२७ च्या बदली प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही, याकरीता आवश्यक त्या सूचना निर्गमित करणेबाबत तसेच दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये यापूर्वी निश्चित केलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत देखील उचित सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या यापुढील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत:-
१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विहीत केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे,

२) दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी आहेत.

३) त्यामुळे उपरोक्त वेळापत्रकानुसार सन २०२६ ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहीत वेळेत पार पाडण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांना सूचित करण्यात येत आहे.

४) शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबविण्याकरीता (तांत्रिक बाबींसाठी) सर्व जिल्हा परिषदांनी एका समन्वय अधिकाऱ्याची/कार्यक्रम अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

५) बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी संबंधित समन्वय अधिकारी/कार्यक्रम अधिकारी यांची राहील.

६) तसेच बदली प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याकरीता मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेकरीता आवश्यकतेनुसार समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

७) त्यानुसार उपरोक्त विहीत वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे.

८) सर्व जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहीत वेळापत्रकानुसार व विहीत केलेल्या टप्प्यांनुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करावी.

९) बदली प्रक्रियेकरीता शासन स्तरावरुन केवळ धोरणात्मक बाबीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येईल.

१०) तथापि, बदली प्रक्रियेदरम्यान उपस्थित तांत्रिक अडचणी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी परस्पर समन्वयाने सोडविण्याची संपूर्ण जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे.

११) बदली प्रक्रियेकरीता विलंब झाल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील, याची नोंद घेण्यात यावी.

दि.07.११.२०२4 रोजीच्या पत्रान्वये शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करणेत आले आहे. सदर वेळापत्रक मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी अवमान याचिका क्र. २१६/२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी या विषयाबाबत दि.०४.11.२०२५ रोजी च्या परिपत्रकान्वये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या विहीत वेळापत्रकानुसार करणेबाबत शासन परिपत्रक 04 November 2025 - Click Here

जिल्हांतर्गत बदली वेळापत्रक दि. 07.11.2024 चे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


जिल्हांतर्गत बदली 2025/26 वेळापत्रक


संवर्ग 1 बदली - 28 एप्रिल ते 3मे ...7 दिवस

संवर्ग 2....4 मे ते 9 मे ...6दिवस


संवर्ग 3....10 मे ते 15 मे ....6 दिवस

संवर्ग 4....16 मे ते 21 मे ....6दिवस

विस्थापित बदल्या...22 मे ते 27 मे....6दिवस

अवघड क्षेत्रातील जागा भरणे....28 मे ते 31 मे ....4दिवस


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/




शिक्षक बदली 2025-26 वेळापत्रक PDF डाउनलोड करा. 


Post a Comment

0 Comments

close