Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा गणेशोत्सव चित्ररथ संचलन (महाराष्ट्र राज्य)

भारताच्या ७7व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना दिल्लीतील कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा गणेशोत्सवावर आधारित चित्ररथ. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेवर आधारित या चित्ररथात अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल पथकातील महिला आणि मूर्तीकारांच्या कलेचे दर्शन घडवण्यात आले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल आणि रोजगाराची संधी यातून आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला. 





देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर लष्करी संचालन पार पडलं. त्यानंतर आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारे विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथही त्यात सहभागी करण्यात आला होता. 


आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार पहायला मिळाले.



दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल झाला आहे. चित्ररथ  येताच “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. गणपती बाप्पाच्या मन मोहून टाकणाऱ्या रूपासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडले.

महाराष्ट्राचा राज्योत्सव आपला ‘गणेशोत्सव’कर्तव्यपथावर. हा सन्मान महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, हा सन्मान आपल्या गणेशोत्सवाचा!



देशाच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचा चित्ररथ म्हणून गणेशोत्सवाचा देखावा सादर करण्यात आला. अष्टविनायक गणेश, गणेशोत्सवातून चालणारे अर्थकारण व आत्मनिर्भर भारताचा मंत्र हा संदेश यातून देण्यात आला.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. या काळात राज्यात तब्बल 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या मोहिमेला कशी चालना मिळते, याचा संदेश महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला आहे.



लोकमान्य टिळकांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. मुंबईसह महाराष्ट्रातमू अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मूर्तीकार, सजावट यातून मिळणारा रोजगार आणि होणार आर्थिक उलाढाल हा विषय या चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.




गणेशोत्सवातील ढोलपथक हासुद्धा आकर्षणाचा विषय असतो. पारंपरिक पोशाखातील महिला ढोल वाजवत गणपती बाप्पाचं स्वागत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या चित्ररथातून होत आहे. 



गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक महाराष्ट्राचा चित्ररथ


७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात आमच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या 'गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कर्तव्यपथावर उत्साहपूर्ण पथसंचलन पार पडले.

या चित्ररथाच्या अग्रभागी ढोल वाजवणारी महिला, मध्यभागी पर्यावरणपूरक शाडूची गणेशमूर्ती, गणेशभक्त व मूर्तिकार, तर मागील भागात अष्टविनायकांची प्रतिकृती असलेली मंदिरे साकारण्यात आली होती. 

कर्तव्यपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंनी पारंपरिक वेशातील लेझीम खेळणाऱ्या महिलांचा सहभाग होता. संपूर्ण संचलनात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती एका जोशपूर्ण गीताद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आली. 



प्रजासत्ताक दिनी सहभागी होणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांमधून भारताची संस्कृती आणि प्रगती दाखवली जाते. देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांमधून चित्ररथ निवडण्याची प्रक्रिया काही महिने आधीच सुरू होते. संरक्षण मंत्रालयाकडून अनेक फेऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर हे चित्ररथ सादर केले जातात.


यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्ररथ निवड ही ऑनलाइन पद्धतीने मत देऊन होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व आपल्या सर्व समूहावरही याबाबत माहिती द्यावी आणि सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करावा, ही विनंती....🙏


📱 कर्तव्यपथावरील सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मत देण्याची प्रक्रिया 


आपल्याला एका मेसेजद्वारे आपले मत द्यावयाचे आहे, यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे 


💬 7738299899 या क्रमांकावर आपणास खालील प्रमाणे मेसेज करायचा आहे.


MYGOVPOLL(स्पेस)344521(comma)9


म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल

MYGOVPOLL 344521,9


( MYGOVPOLL 344521,9 एवढाच भाग कॉपी करून आपणास मेसेज बॉक्समध्ये पेस्ट करता येऊ शकेल)


कृपया आपण त्वरित आपले मतदान करावे. आपले स्नेही, मित्र, परिचित सर्वांना मतदान करण्यासाठी आग्रह करावा, ही विनंती...

Post a Comment

0 Comments

close