Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test - Geography of Maharashtra

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test - Geography of Maharashtra 






शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की. 

या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. 

समाविष्ट घटक 

महाराष्ट्राचे स्थान विस्तार व सामान्य माहिती 

महाराष्ट्र प्राकृतिक रचना 


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 - महाराष्ट्राचा भूगोल

TET Online Test 1 - Geography of Maharashtra 


प्रश्न 1 - खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही.

  1. गुजरात 
  2. तेलंगणा 
  3. बिहार 
  4. गोवा


प्रश्न 2 - महाराष्ट्र राज्याचे स्थान भारताच्या कोणत्या भागात आहे?

  1. पश्चिम मध्य 
  2. दक्षिण मध्य 
  3. आग्नेय 
  4. पूर्व मध्य


प्रश्न 3 - क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

  1. पहिला 
  2. दुसरा 
  3. तिसरा 
  4. चौथा


प्रश्न 4 - समुद्रकिनाऱ्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? (720 किमी)

  1. पहिला 
  2. दुसरा 
  3. तिसरा 
  4. चौथा


प्रश्न 5 - महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून समुद्रकिनारा आहे, त्यापैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यास लाभला आहे?

  1. रत्नागिरी 
  2. रायगड 
  3. मुंबई 
  4. पालघर 


प्रश्न 6 - खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही.

  1. गुजरात 
  2. तेलंगणा 
  3. बिहार 
  4. गोवा


प्रश्न 7 - महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी व राज्य प्राणी अनुक्रमे कोणते?

  1. शेकरु व हरियाल 
  2. ताम्हण व शेकरु 
  3. ब्लू मॉरमॉन व हरियाल
  4. हरियाल व शेकरु


प्रश्न 8 - महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा व राज्य फुलपाखरू अनुक्रमे कोणते?

  1. सुरमई व नीलपरी (ब्लू मॉरमॉन)
  2. सिल्व्हर पापलेट व नीलपरी 
  3. डॉल्फिन व नीलपरी 
  4. बांगडा व नीलपरी 


प्रश्न 9 - महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते?

  1. दांडपट्टा 
  2. भाला 
  3. तलवार 
  4. वाघ नखे

प्रश्न 10 - महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत?

  1. चार 
  2. पाच 
  3. सहा 
  4. दहा


प्रश्न 11 - खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाडा या प्रादेशिक विभागात येत नाही?

  1. हिंगोली 
  2. धाराशिव 
  3. अकोला 
  4. नांदेड


प्रश्न 12 -  कोकण किनारपट्टी ................... प्रकारची आहे.

  1. दंतूर 
  2. पठारी 
  3. सपाट 
  4. खोल

प्रश्न 13 -  सह्याद्री पर्वताला मान्सून वारे अडून कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

  1. आरोह पाऊस 
  2. प्रतिरोध पाऊस
  3. अवरोह पाऊस 
  4. आवर्त पाऊस


प्रश्न 14 - सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते?

  1. कांचनगंगा
  2. अस्तंभा 
  3. दोडाबेट्टा
  4. कळसूबाई 


प्रश्न 15 -  म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1. छत्रपती संभाजी नगर 
  2. सातारा 
  3. अमरावती 
  4. नंदुरबार

प्रश्न 16 - खांदेरी उंदेरी हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात येतो ?

  1. मुंबई 
  2. पालघर 
  3. रायगड 
  4. रत्नागिरी 


प्रश्न 17 - थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

  1. पुणे मुंबई 
  2. कोल्हापूर सावंतवाडी 
  3. कराड चिपळूण 
  4. मुंबई नाशिक


प्रश्न 18 - खालीलपैकी कोणता घाट रत्नागिरी जिल्ह्याची संबंधित नाही ?

  1. आंबा घाट
  2. कुंभार्ली घाट
  3. अणुस्कुराघाट 
  4. माळशेज घाट 

प्रश्न 19 -  गोदावरी व भीमा नदी दरम्यान पसरलेल्या डोंगरावर कोणत्या?

  1. सातमाळा अजिंठा डोंगर रांग 
  2. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग 
  3. शंभू महादेव  डोंगर रांग 
  4. विंध्य पर्वत रांग


प्रश्न 20 - महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्यप्रदेश या राज्यात लागून आहे?

  1. 9


प्रश्न 21 -  जिल्हा व त्यापासून तयार झाला नवीन जिल्हा यामधील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा?

  1. छत्रपती संभाजीनगर - लातूर 
  2. अकोला - वाशिम 
  3. धुळे - नंदुरबार 
  4. मुंबई - ठाणे


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 महाराष्ट्राचा भूगोल उत्तरसूची 

1-3,  

2-1,  

3-3, पहिला राजस्थान , दुसरा मध्यप्रदेश 

4-4, सर्वाधिक गुजरात

5-1  इतर जिल्हे - नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग 

6-3

7-4

8-2

9-1 महाराष्ट्र राज्याने 19 फेब्रुवारी 2024 रोजी घोषित केले.

10-3 प्रसाशकीय विभाग -6 तर प्रादेशिक विभाग -5 आहेत.

11-3

12-1  13-2

14-4 कळसूबाई शिखर उंची - 1646मी

15-1

16-3

17-4

18- 4 माळशेज - आळेफाटा ते कल्याण 

19-2 तापी व गोदावरी - सातमाळा अजिंठा, गोदावरी व भीमा - हरिश्चंद्र बालाघाट, भीमा व कृष्णा - शंभू महादेव 

20-2 

21- 4 मुंबई - मुंबई उपनगर

Post a Comment

0 Comments

close