Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी नशा मुक्ती प्रतिज्ञा मोहीम | नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा - 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट

राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा मोहिमेबाबत...




भारत सरकारसोबत नशा मुक्त भारत अभियानांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, मेडिकल विंग (Rajayoga Education & Research Foundation) यांच्यामार्फत दिनांक ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये देशव्यापी "नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा" आयोजित करत आहे, ज्याचा उद्देश ४ कोटी नागरिकांना - विशेषतः युवक/युवती आणि विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विरोधात प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे.


विद्यार्थी आणि युवकांना ही प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करून, आपण एकत्रितपणे व्यसने, तणाव आणि जीवनशैलीतील आजारांपासून मुक्त समाज घडवू शकतो. एकत्रितपणे "Say No to Drugs, Say Yes to Life" (व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा) या संदेशासह राज्यातील या मोहीम कालावधीत प्रतिज्ञा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभागी होण्याकरिता आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात.


२. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी शासनास सादर करावा.


३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८०४१५२१०५७२४९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी नशा मुक्ती प्रतिज्ञा मोहीम राबविणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close