राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी, तंत्र कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना दिला जाणारा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी जाहीर केले. वर्ष २०२४-२५ साठी २०, तर वर्ष २०२५-२६ साठी २२ शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन माळी, मुंबईतील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील प्रा. विरेंद्र नगराळे, व्हीजेटीआयमधील डॉ. नितीन परशराम : गुल्हाणे यांचा २०२५-२०२६ च्या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा समावेश आहे.
उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कला शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राचार्य व शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. गेल्या दोन वर्षांसाठी प्रलंबित असलेली पुरस्कार निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याने शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात दोन वर्षासाठी मिळून राज्यभरातील ४२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठे, संबंधित महाविद्यालयांमधील प्राचार्य व शिक्षकांचे प्रस्ताव मागविले होते.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन वेबसाईट - Click Here
या पुरस्कार प्राप्त प्राचार्य आणि शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले जाणार असल्याचे सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी कळविले आहे.
संचालक आणि विद्यापीठ स्तरावर : संचालक आणि विद्यापीठ स्तरावर छाननी झाल्यानंतर पात्र प्रस्ताव केंद्रीय छाननी समितीकडे पाठविण्यात आले. ५० पेक्षा कमी गुण मिळालेल्या प्रस्तावांना निवडीतून वगळण्यात आले. त्यानंतर पात्र प्रस्ताव राज्यस्तरीय निवड समितीकडे पाठविण्यात आले. त्यातून या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.





0 Comments