Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणित शिक्षकांचे प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गणित शिक्षणाचा दर्जात्मक विकास व्हावा या उद्देशाने मुंबई आयआयटी व राज्य सरकारतर्फे 'क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथ्स एज्युकेशन' हा उपक्रम सन २०१५पासून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात गणित शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची निवड ही प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. ही परीक्षा यंदा १४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.
परीक्षेसाठी यासाठी अर्ज करण्याची अंतिम मूदत २ जुलै असून इच्छुक शिक्षकांनी https://goo.gl/forms/pVgrUtJXIKgmniwx1 यावर अर्ज करावा. या उपक्रमाअंतर्गत २७३ गणित शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत १२ हजार ५०० शिक्षकांना थेट प्रशिक्षण दिले गेले आहे. मास्टर ट्रेनरची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने ३०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी gom.vbttp@gmail.comवर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

close