खासगी संस्थांना शिक्षकांची गरज असेल, तर त्यांना शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात द्यावी लागेल. वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची गरज नाही.
त्यानंतर ऑनलाइन अर्ज मागविले जातील. उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.
सर्वाधिक गुणवत्तेनुसार आवश्यक उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करणे संबंधित संस्थांना बंधनकारक राहील.
वर्षांतून दोन वेळा भरती प्रक्रिया राबविण्यात येईल
===========================
मुंबई- राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता (अॅप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.
२०० गुणांची परीक्षा : शिक्षण सेवक भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून २०० गुणांची राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल. इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील.
गुणांच्या आधारेच होणार निवड : या चाचणीत मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत आणि खाजगी शैक्षण�
13 Comments
खुप छान
ReplyDelete.पुणे :गणेश खळदकर
ReplyDeleteराज्यातील प्राथमिक,उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुध्दीमापन चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या 12 डिसेंबरपासून ही परीक्षादेखील सुरू होत आहे.परंतु काही शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने संस्थाना दिलासा दिला आहे. संस्थांनी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्तपदांची विषय व प्रवर्गनिहाय माहिती दोन दिवसांमध्ये शासनाकडे द्यावी. त्यानंतर शासनाने त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे स्षष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीवरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
सन 2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तीक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता देखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषीत केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी यासाठी शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीच्या आधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार दिवाकर पांडे म्हणाले, नागपूर, अमरावती विभागातील संस्था शिक्षकभरतीसंदर्भात न्यायालयात गेल्या होत्या. त्यानुसार न्यायालयाने संस्थाच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची प्रवर्गानुसार माहिती शासनाला द्यायची आहे. आणि या जागांवर
हे फार लवकर व्हायला हवं होतं,अत्यंत योग्य आणि स्तुत्य शासन निर्णय.संस्थाचालक जे मालक झाले होते त्यांना पोटसुल उठला मग न्यायालयात धावणारच.शासन आणि न्यायालय आता या निर्णयावर ठाम राहायला हवे त्याशिवाय खऱ्या गुणवत्ताधारकाना,विद्यार्थ्यांना आणी पर्यायाने शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळणार नाही.महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती होण्याच्या दृष्टीने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.आता समजेल सेवाभावी संस्थाचालक कोण आणि मालक कोण?
ReplyDeleteलय भारी ..
ReplyDeleteAll the best
ReplyDeleteमस्त. असे झाले तर इंटिग्रेटेड कॉलेजेस आपोआप बंद होतील. शिकवणी ल आला बसेल.
ReplyDelete👍
ReplyDeleteपन जूनी लोक chbवर काम करतात त्यांच काय
ReplyDeleteगव्हर्मेंट GR आहे का ?
ReplyDelete20/06/18 ला निघालेल्या आदेशानुसार जात वैधता लगेच सादर करावे असे दिले आहार..पूर्वी निवड झाल्यावर 6 महिने मुदत मिळायची.. याबद्दल अधिक मार्गदर्शन व्हावंE
ReplyDeleteयामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल
ReplyDeleteया शासन निर्णय मुळे गुणवत्ता धारक उमेदवार निवडीला वाव मिळेल ऐरीगैरीची भरती बंद होईल संस्थाचालकांच्या नातेवाईक निवडीला आळा बसेल . शिक्षकांना होणारा मानसिक आणि आर्थिक त्रास नक्कीच थांबेल.
ReplyDeleteAtta pn paper mde advertisement yete mag yadvare zalelya niyukti legal rahnar Kay
ReplyDelete