दाता तू गणपती गजानान
भजती तुजसी गुणीजन
मुक्ता माणिक किरिट शिरावर
गौरतनु वर कस्तुरी केशर
निर्गुण निरवधी सकळ कलानिधी
हे प्रभुवरा अमरनायका
हे शुभकरा भावे तुजसी आलो शरण
शुंडा उदरी वळली अभिनव
कांती मनोहर रूप नवोनव
रुणझुण चरणी वाजती किंकिणी
हे नटवरा ललित लाघवा
हे प्रियकरा व्हावे घडीघडी एक स्मरण


0 Comments