रक्तदाब म्हणजे काय?..सामान्य माहिती ..
शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
रक्तदाबाची कारणे .. आनुवंशिकता, स्वभाव व मानसिकता , धुम्रपान , मद्यपान' , मिठाचा अतिरेक , रक्तवाहिन्यांचा कठीणपणा, लठ्ठपणा, अतिरक्त वजन ई .रक्तदाबाची कारणे असू शकतात .
1.उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
2.अक्रोड किवा अक्रोडचे तेल आहारात समाविष्ट केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
3.लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
4.मधुमेहांनी उच्च रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे चिकित्सक सल्याने गिलोइचा रस घेतल्यास फायदा होतो .
5.पोटॅशियमयुक्त फणस हे फळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. परिणामी वाढणारा हृद्यविकाराचा धोकाही आटोक्यात राहतो.
6.दुधी भोपळा क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अल्सर मूत्राशयाचे आजार यांवर गुणकारी आहे. वजन कमी करणारा आहे.
7.हृदयबलवर्धक डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण रहाते. शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत होते.
8.रक्तदाबावरील औषधे घेऊन रक्तदाब नियंत्रणात राहीलच असे नाही. त्याबरोबरीने जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे .
9.गुंतागुंतीची जीवनशैली आणि आरोग्याबाबतची बेफिकिरी-बेपर्वाई रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे.
10.ऊसाच्या रसाबरोबर थोडासा आल्याचा रस मिसळून दररोज पिल्यास रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते .
11.आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे.
12.दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत.
13.क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
14.मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत.
16.नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा.
17. ध्याना मुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते.
18.योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी.
19.वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत योगासने करणे आवश्यक आहे. योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो
0 Comments