Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्याचा पाय स्कूल बसमुळे जायबंदी

म. टा. प्रतिनिधी. औरंगाबाद
स्कूल बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या पायावर बसचे चाक गेल्याने विद्यार्थी जायबंदी झाला. गांधेली येथे गुरुवारी सकाळी सात वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब कारभारी वाघ (वय ३७ रा. आडगाव) यांचा मुलगा ओम (वय १५) हा झाल्टा येथील शिवछत्रपती महाविद्यालयात शिकतो. शाळेत जाण्यासाठी त्याला स्कूल बस लावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी स्कुल बसने ओम हा इतर विद्यार्थ्यासोबत शाळेत जाण्यासाठी निघाला होता. यावेळी गांधेली येथील आतील रस्त्यावर शेळ्या स्कूल बसपुढे आडव्या आल्या. बसचालक नवनाथ भुजंगराव घोडके (वय ४०, रा. एकोड पाचोड) याने ओमला खाली उतरवून शेळ्या हाकलण्यास सांगितले. ओम हा शेळ्या हाकलल्यानंतर बसमध्ये चढत असताना चालक घोडके याने अचानक बस सुरू केली. यामध्ये ओम हा खाली पडून त्याच्या उजव्या पायावरून बसचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. याच बसमध्ये ओमची चुलत बहीण देखील होती. तिने ओमच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. भाऊसाहेब वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून ओमला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात बसचालक नवनाथ घोडके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

close