"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम" सन 2015-16 पासून राज्यात सुरू करण्यात येत असून त्याअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माधयमाच्या मान्यता प्राप्त शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवी तील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल. याबाबतच्या कार्यवाहीची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. (अ) सर्व नियमित विद्यार्थ्यांना किमान अपेक्षित क्षमता अवगत असायलाच हवी. याबाबत सर्व विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादणुकीची खात्री शैक्षणिक प्रगती चाचणीद्वारे केली जाईल. या क्षमतांमध्ये एकही मूल अप्रगत राहणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यासाठी शासन, प्रशासन,शालेय व्यवस्थापन विशेष प्रयत्न करणार असून शिक्षकांनी त्याची मुख्र्य जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
प्रथम सत्र आकारिक मुल्यमापन चाचणी क्रमांक 1
0 Comments