भारतीय डाक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पत्र लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी, तसेच डिजिटल युगात मानवी नाते संबंधांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत ९ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धकाने मित्र-मैत्रिणीला उद्देशून पत्र लिहायचे आहे. यामध्ये स्पर्धकांना महाराष्ट्र सर्कल व राष्ट्रीय स्तरावर रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. २० फेब्रुवारीपर्यंत भरून देणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा विषय.
'डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत याबद्दल मित्राला पत्र लिहा', असा स्पर्धेचा विषय.
आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा विजेत्या स्पर्धकांना दिली जाणारी बक्षिसे
राष्ट्रीय स्तर -
प्रथम ५०,०००रुपये,
द्वितीय २५,००० रुपये,
तृतीय १०,००० रुपये.
सर्कल (राज्य) स्तर -
प्रथम २५, ०००रुपये,
द्वितीय १०,००० रुपये,
तृतीय ५००० रुपये.
आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा माहिती
भारतीय टपाल विभागातर्फे युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची २०२६ ची आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा ९-१५ वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 'डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत' या विषयावर पत्र (८०० शब्दांत) लिहून, २० मार्च २०२६ पर्यंत संबंधित टपाल कार्यालयात पाठवावे. प्रथम विजेत्याला ₹५०,००० आणि सुवर्णपदकासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी आहे.
या स्पर्धेत ९ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धकाने मित्र-मैत्रिणीला उद्देशून पत्र लिहायचे आहे. यामध्ये स्पर्धकांना महाराष्ट्र सर्कल व राष्ट्रीय स्तरावर रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. २० फेब्रुवारीपर्यंत भरून देणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचा तपशील (२०२६):
विषय: "डिजिटल जगात मानवी कनेक्शन महत्त्वाचे का आहे याबद्दल मित्राला पत्र लिहा".
पात्रता: ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी.
अंतिम तारीख: २० मार्च २०२६.
भाषा: मराठी किंवा आठव्या अनुसूचीतील कोणतीही भारतीय भाषा.
प्रक्रिया: ही हाताने लिहिलेली पत्रे (Handwritten) पाठवणे आवश्यक आहे.
या आहेत भाषा
स्पर्धा दि. ८ मार्चला आयोजित केली जाणार आहे. शाळांमार्फत अर्ज मागविले आहेत. विद्यार्थ्यांनी ८०० शब्दांमध्ये पत्र लेखन करायचे आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू किंवा मराठी माध्यमातून त्यांना स्पर्धेत भाग घेता येईल. विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सन २०२४ मध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये पहिली आलेल्या सलोनी घुगे (ओरिअन इंग्लिश मीडियम स्कूल) हिला २५ हजार रुपये, तर २०२५ मध्ये महाराष्ट्र सर्कलमधून द्वितीय आलेल्या केतन पाटील (ए. टी. झांबरे शाळा) याला १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत भाग घेण्यासाठी २० तारखे पर्यंत मुदत
स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. २० फेब्रुवारीपर्यंत भरावे. अर्जासोबत ३ पासपोर्ट फोटो, शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी.
इंग्रजी व हिंदीमध्ये भरलेला अर्ज मुख्याध्यापकांद्वारे स्वाक्षांकित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज शाळेत जमा करावेत.
शाळांनी हे अर्ज मुख्य टपाल कार्यालयात जमा करावेत, अशी माहिती डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. व्ही. मुंढे यांनी दिली.



0 Comments