Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?*  

🍃🍃🍃

*पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?*  

लेख ३ 
 
सुखी व आनंदी जीवनासाठी सकारात्मक विचारसरणी यशस्वी, अतिशय आवश्यक आहे. माझ्या प्रत्येक कार्यशाळेत अनेकजण मला विचारतात, ‘पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?’ यासाठी माझ्या मागील काही लेखापासून पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याच्या नेमक्या युक्त्या देत आहे.

मागील गोष्टी, भूतकाळातील गोष्टी उकरून काढणे हा मानवी स्वभावाचा एक भाग म्हटला पाहिजे. अशा गोष्टी उकरून काढून वाद निर्माण केल्याने मोठ्या प्रमाणावर नकारात्मक उर्जा तयार होते. अनेक कुटुंबात जुने कौटुंबिक वाद असतात. बहुदा त्यावर पडदा पडलेला असतो. पण काही कारणाने हे वाद परत उफाळून येतात व वातावरण दुषित करून टाकतात. अशा वादांपासून दूर रहाणे हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा महत्त्वाचा भाग आहे.

****************************
*डॉ. आशिष गुरव*
(मोटिव्हेशनल स्पीकर व लाईफ कोच)
ऑफिस संपर्क 8421290947, 9765256928
वैयक्तिक शंका, अडचणीसाठी संपर्क करा
www.drashishgurav.com

****************************
माझा एक मित्र आहे. त्याच्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली आहेत. आता तो आणि त्यांची बायको एका मुद्द्यावर भांडतात. मुद्दा असा आहे, ‘आपल्या लग्नात तुझ्या मावशीने माझ्या मावशीचा अपमान केला.’ आता पहा, लग्नाला झाली पंचवीस वर्षे, दोन्ही मावश्या मरून झाली दहा वर्षे, तरीही हा निरर्थक वाद चालू आहे. आता काय बोलायचे?

अनेक कुटुंबात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. लग्न, समारंभ किंवा इतर काही कारणाने कुटुंबातील लोक एकत्र येतात. त्यातील आनंद राहिला बाजूला, पण जुने वाद उकरून काढले जातात. अगदी रडारडी, मारामारीची वेळ येते. असा वाद निर्माण करणारा एखादाच नातेवाईक असतो. त्याच्यासमोर आपण सकारात्मक रहाणे खूप महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तीला टाळणे, न बोलावणे हेच हितकर होय.

अशा नकारात्मक वातावरणाचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होते, हे कृपया लक्षात ठेवावे.
जुन्या गोष्टी आपण बदलू तर शकत नाही. त्या परत परत उगाळून काय होणार? ऑफिस, व्यवसाय, नोकरीचे ठिकाण या ठिकाणीही ही गोष्ट पाळावी. सहकाऱ्याबरोबर जुने वाद वाढवू नयेत. असे वाद घालणे म्हणजे ब्लडप्रेशर वाढवून घेणे होय.

‘Let go the past’  हे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करावा. जुने विसरून जाऊन, पुढे पुढे चालत रहाणे, ही सकारात्मक विचारसरणी होय.  ‘जुने जाऊद्या मरणालागुनि, जाळूनी किंवा पुरुनि टाका’ असे कवी केशवसुत यांनी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. ही गोष्ट कौटुंबिक, वैयक्तिक पातळीवर सुरु केली तर हळूहळू सामाजिक पातळीवर येईल. त्यामुळे उकरून काढलेले जातीय, राजकीय वाद व त्यातून निर्माण होणारी तेढ कमी होईल. यातूनच समाजाची पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वाटचाल होईल.

🍃🍃🍃

Post a Comment

0 Comments

close